नवी मुंबई: काश्मीर मध्ये ३७० कलम हटवला याचा स्वागत पण तुम्ही नवीन कलम आणलाय का?,अन्याय करायचं असेल तर देशातील एकमेव राज्य म्हणजे महाराष्ट्र.असे काही कलम काढले आहे का ? घणाघाती आरोप शिवसेना उबाठा युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केला. आज नवी मुंबईतील दिघा रेल्वे स्टेशन सुरु करावे या मागणी साठी आयोजित सही अभियानाला ते आले होते.
दिघा रेल्वे स्टेशन पूर्ण बनवण्यात आले असूनही जवळपास ८ महिन्यापासून उद्धाटन विना जैसे थे अवस्थेत आहे. ते लवकरात लवकर सुरु करण्यासाठी सही अभियान राबवण्यात आले यासाठी आदित्य ठाकरे हे उपस्थित होते. तसेच सानपाडा येथे उबाठा शिवसेना कार्यालय उद्धाटन हि त्यांनी या दौऱ्यात केले. दिघा स्टेशनवर त्यांनी सही मोहिमेला उपस्थिती दर्शवत भाजप शिंदे सरकार वर टीका केली. सरकार पाडल उद्योजकांना सांगितलं जायचं कुठे तर गुजरातला? महाराष्ट्राचा खेचून गुजरातला घेऊन जाता याचा दुःख आहे. वेदांता कॉक्स कोण गेलं कुठे गुजरातला, सरकार पाडले आणि वेदांतील गुजरातला नेले.
हेही वाचा >>>एमएमआरडीएने विकास कामे पूर्ण न केल्याने चिर्ले ग्रामस्थांचा अटलसेतुच्या उदघाटनाच्या दिवशी आंदोलनाचा इशारा
एक लाख नोकरी राज्यातील गेल्या. गुजरात मध्ये गेले प्रत्येक राज्याने उत्कर्ष साधला पाहिजे मात्र तिथे त्यांनी सांगितलं आम्हाला परवडणार नाही. यामुळे नुकसान कोणाचं झालं तर देशाचं. एमटीएचएल अडीच महिने झाले तयार आहे मात्र उद्घाटन झालेलं नाही कारण त्यांना वेळ मिळालेला नाही आहे. काल विमानतळ सी लिंकच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली यावर त्यांचे नाव न घेता पाहणी करून आले फोटोग्राफी करून आले. पण अजूनही पूर्णपणे कन्फर्म झालेलं नाही अशी ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी केली तसेच एमटीएचएल तयार आहे की नाही. १५ जानेवारीच्या आधी एमटीएचएल चा उद्घाटन झालं नाही तर आपल्याला सर्वांना जाऊन एमटीएचएल चे उद्घाटन करावे लागेल.असा इशारा त्यांनी दिला. सर्व काही गुजरातला जात आहे . वेदांता फॉक्स गुजरात मध्ये गेले, असे अनेक प्रकल्प गुजरातला गेले एवढेच नव्हे तर वर्ड कप ते सुद्धा गुजरातला नेले राज्यात हि फायनल झाली असते तर वर्ड कप जिंकला असता. जाती जातीत राज्य राज्यात भांडणे लावली जात आहे. असा आरोप ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला. केला. यावेळी खासदार राजन विचारे, बेलापूर विधानसभा अध्यक्ष विठ्ठल मोरे तसेच अनेक शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
ठाकरे ऑन बाईट
दोन वर्षांपासून महाराष्ट्र अन्याय सहन करीत आहे. अनेक प्रकल्प गुजरातला गेले. राज्यात अनेक प्रकल्प तयार आहेत मात्र उद्धाटन अभावी लोकसेवेत नाहीत. वाल्मिकी विमानतळ तयार आहे याचे आम्ही स्वागत करतो. मात्र दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ बाबत कोणी बोलत नाही. संभाजी नगर विमानतळ बाबत बोलत नाही याचे नामांतर आम्ही केले होते. मात्र कोणी उल्लेख केले आहे. ठाणे लोकसभा हि लोकहित साठी लढत आहेत. आम्ही देशहित साठी लढत आहोत.