नवी मुंबई पोलीस विभागात भरती प्रक्रिया सुरु होणार असून २०४ पोलीस शिपायांची भरती केली जाणार आहे. यासाठी तब्बल १२ हजार ३७५ अर्ज आले आहेत. ही भरती प्रकिया २ जानेवारी ते १३ जानेवारी दरम्यान कळंबोली मुख्यालय मैदानात पार पडणार आहे. या सर्व प्रक्रियेवर कॅमेराची नजर असणार आहे.
हेही वाचा- नवी मुंबई : नववर्षानिमित्त विक्रीसाठीची नवी वाहने रस्त्यावरच; नो पार्किंग जागेतच बेकायदा पार्किंग
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात शिपाई पदाची भरती करण्यात येणार आहे. यासाठी शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी १५ डिसेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. या २०४ पदांच्यासाठी तब्बल १२ हजार ३७५ अर्ज आले आहेत. यात १० हजार ४३४ पुरुष, एक हजार ७९४ महिला आणि १४७ माजी सैनिकांचे अर्ज दाखल झालेले आहेत. हि परीक्षा मैदान चाचणी ५० गुण आणि १०० गुण लेखी परीक्षेला असणार आहेत. मैदानी चाचणी २ जानेवारी पासून सुरु होणार १३ जानेवारी पर्यंत चालणार आहे. यात गोळा फेक, १०० मीटर धावणे, १६०० मीटर धावणे या शिवाय महिलांच्यासाठी गोळा फेक , १०० मीटर आणि ८०० मीटर धावणे याचा समावेश आहे.
हेही वाचा- बंदरावरील उद्योगात नोकर भरतीसाठी प्रकल्पग्रस्तांना अर्ज करण्याचे आवाहन; ६ जानेवारी २०२३ पर्यंत मुदत
परीक्षेत पारदर्शकता ठेवण्यासाठी सर्व प्रक्रिया कॅमेरात कैद करण्यात येणार आहे. पोलीस भरती दरम्यान उमेदवारांना येणाऱ्या अडचणी समस्याच निराकरण करण्यातही नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या www.navimumbaipolice.gove.in या संकेत स्थळावर भेट देणे आवश्यक आहे. राज्यातील विविध भागातून येणाऱ्या उमेदारांच्यासाठी सोयी सुविधा राहणे जेवण आदी साठी सामाजिक संस्थांना आवाहन करण्यात आले आहे. भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवारांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय कक्ष देखील उभारण्यात येणार आहे.
हि भरती प्रक्रिया पूर्ण पारदर्शक होणार असून सर्व परीक्षा कॅमेरात कैद होणार आहे. त्यामुळे नौकरी लावतो म्हणून कोणी आमिष दाखवत असेल तर बळी पडू नका. असे प्रकार समोर आले तर नियंत्रक कक्ष, लाच लुचपत विभागाशी संपर्क करावा असे आवाहन प्रशासन उपायुक्त संजय कुमार पाटील यांनी दिली.