नवी मुंबई : Manoj Jarange Patil Maratha Quota Rally Mummai मराठा आरक्षण मागणी साठी निघालेल्या मोर्चाने लोणावळ्यातून पनवेल कडे कूच केली आहे. अशात अनेकांनी थेट नवी मुंबई गाठली. आता आमचा मुक्काम येथेच असून आरक्षण घेतल्या शिवाय मुंबई सोडणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी जोश पूर्ण घोषणाबाजीही केली.
मनोज जरांगे पाटील हे पनवेल नवी मुंबईच्या दिशेने निघालो असून अनेकांनी थेट नवी मुंबई गाठली आहे .यात सांगली , मिरज, संभाजीनगर, आणि परभणीतील लोकांचा समावेश आहे. या सर्वांनी नवी मुंबईतील मराठा बांधवांनी केलेल्या स्वादिष्ट जेवणाचा आनंद एपीएमसीतील कांदा बटाटा मार्केट मध्ये घेतला. पोळी (चपाती), भाकरी, बटाट्याची रस्सा भाजी , मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला खास मसाले भात कोशिंबीर आणि बुंदीचा लाडू असा मेनू होता.
दुपारी साडेतीन चार पर्यंत व्यवस्थित जेवण न झाल्याने या ठिकाणी मसाले भात खाऊन तृप्तीची ढेकर आम्ही दिली अशी प्रतिक्रिया संगलीहून आलेल्या रणजित पाटील यांनी दिली. तर या ठिकाणी नवी मुंबईकरांनी आपुलकीने स्वागत करीत अगत्याने जेवण दिले असे परभणी रोहित चव्हाण आणि अनिकेत चव्हाण यांनी सांगितले तर जो काही मेनू होता तो आम्हाला गावाकडील चव देऊन गेला असे संभाजीनगरहुन आलेले कैलास कचकुरे यांनी सांगितले.