ल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी सायंकाळी मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. भाजपविरोधात देशपातळीवर विरोधकांची आघाडी उभारण्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे समजते. ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना करोनाशी मुकाबला करताना केलेल्या कामगिरीचे केजरीवाल यांनी कौतुक केले. या भेटीवर असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे.

ऑल इंडिया मजलीस-ए- इत्तेहादुल मुसलिमिन अर्थात ए.आय. एम. आय. एम. चे पहिलेच राष्ट्रीय आधिवेशन मुंबईत होत आहे. याचीच माहिती देण्यासाठी नवी मुंबईतील महापे येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरांचे नामकरण, राजकारणातील पळवापळवी, वेगवेगळ्या विचारांच्या पक्षांच्या भेटीगाठी आदी विषयांवर पार्टी अध्यक्ष ओवेसी यांनी भाष्य केले. लोकसभा निवडणुकीत आम्ही औरंगाबाद जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Uddhav Thackeray On Raj Thackeray :
Uddhav Thackeray : “पक्षाला एक हेतू लागतो, पण हे त्या पक्षात…”, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
Ramdas Athawale On Raj Thackeray
Ramdas Athawale : “मी असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?”, रामदास आठवलेंचं मोठं विधान
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मी होतो तरीही…”
Samajwadi Party objects to Thackeray groups Hindutva stance print politics news
ठाकरे गटाच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर ‘सपा’चा आक्षेप
Sanjay Raut on Raj Thackeray
Sanjay Raut on Raj Thackeray: “राज ठाकरे भाजपाच्या हातातलं…”, देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांची टीका
uddhav thackeray Nana Patole
मनपा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत बिघाडी? हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून काँग्रेस-शिवसेना आमनेसामने, एक्सवर राडा

हेही वाचा- नवी मुंबई: राजकीय कट्टर विरोधक बेकायदा झोपडपट्टी मुद्द्यावर एकत्र येत आयुक्त समवेत बैठक

उद्धव ठाकरे यांना अरविंद केजरीवाल भेट दिली यावर मिश्किल टिपण्णी करीत ओवेसी यांनी छोटा रिचार्ज येऊन गेल्याचे समजले असे भाष्य केले. पत्रकारांना माहिती देताना सांगितले की किती लोकसभा लढणार यावर आदिवेशनात विचार होणार आहे तसेच कुणावर बरोबर आघाडी करू यावर आम्ही नंतर सांगू . नंतर कळेल मुस्लिमांच्या विरोधात अन्याय आहे असा दावाही त्यांनी केला दंगल. वंचित आघाडी पूर्वी एम आय एम सोबत होती आता उद्धव ठाकरे सोबत आहे या बाबत विचारणा केली असता प्रकाश आंबेडकर यांना माझ्या शुभेच्छा एवढेच उत्तर त्यांनी दिले. हरियाणा राजस्थान मध्ये अल्पसंख्यांक अन्याय होत असताना देशातील परिस्थिती बिघडत असताना त्यावर काम करण्याऐवजी भारत जोडो यात्रा काढण्यात येते अशी टिका त्यांनी काँग्रेस वर नाव न घेता केली.

हेही वाचा- नवी मुंबई: उष्मा वाढल्याने हापूस तोडणीला लगबग

मोदी यांचा विषयी बीबीसीने बनवलेल्या माहिती पटावर बंदी घातली  . मग मुस्लिम विरोधात असलेले व्हिडीयेो युट्यूब वरून का काढत नाही असा सवालही त्यांनी केला. खालिस्तान ची परत एकदा मागणी जोर धरत आहे या बाबत विचारणा केली असता यावर भाजपा काय बोलत नाही 

आम्हाला का विचारता असा उलट प्रश्न त्यांनी करीत अधिक बोलण्याचे टाळले. लव्ह जिहादचे मोर्चे निघतात त्या मागे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे असा दावा त्यांनी केला.यावेळी ओवेसी यांनी युनिफार्म सिव्हिल कोडचा विरोध करीत भाजप एकाधिकारशाहीने राज्य करीत असल्याची टिका केली. औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांचे अनुक्रमे छत्रपती संभाजी नगर , आणि धाराशिव नामकरण केल्याचा त्यांनी निषेध व्यक्त केला. हा निर्णय आघाडी सरकार वेळी झाला त्यात एनसिपी आणि काँग्रेस हे सहकारी पक्ष होते त्यामुळे आता त्या पक्षातील जेष्ठांनी समोर येऊन अभिनंदन करावे असे आवाहन जलील यांनी केले.व्हिक्टोरिया टर्मिनसचेही नामकरण केले मात्र हे स्टेशन इंग्रजांनी बांधले हा इतिहास बदलू शकत नाही.असे जलील यांनी मत व्यक्त केले.

हेही वाचा- नवी मुंबई पोलिसांनी जप्त केला ६१ लाख ८० हजार रुपयांचा गुटखा; दोन टेम्पोही ताब्यात

या आदिवेशनात १६ राज्याचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून सर्वांचे मत जाणून घेण्यात येणार आहेत. सध्या नवी मुंबईत असून दुपार नंतर चेंबूर आणि संध्याकाळी मुंब्रा येथे सभा घेतली जाणार आहे. यावेळी ग्रामपंचायत ते देशपातळीवरील समस्यांचे अवलोकन करण्यात येणार आहे.

Story img Loader