पनवेल : मानधनाऐवजी पगार आणि सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा या मुख्य मागणीसाठी पनवेल महापालिका मुख्यालयाच्या इमारतीसमोरील महात्मा गांधी उद्यानात मंगळवारी सकाळी आशा वर्कर महिलांनी निदर्शने केली. एक दिवसीय धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने महिलावर्ग सहभागी झाला होता. राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने या महिलांचे नेतृत्व केले.
हेही वाचा – चंद्रपूर : सोयाबीनवर पिवळा मोझॅक, उंट अळीचे आक्रमण; पिकांची अवस्था…
हेही वाचा – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठीचा अर्ज आता एका क्लिकवर.. ही आहे प्रक्रिया..
पनवेल पालिकेतील आरोग्य विभागात १८३ आशा वर्कर काम करतात. मंगळवारी पालिकेविरोधात विविध घोषणा देऊन आशा वर्कर महिलांनी परिसर दणाणून सोडला. कामाचे तास निश्चित केले जावेत, सुट्टी व रजा नियमानुसार मिळावी, ऑनलाईन कामे लादू नयेत, एएनएम आणि इतर कर्मचाऱ्यांची कामे लादू नयेत, पालिकेचे ओळखपत्र मिळावे, माता मृत्यू व बालमृत्यू यांसाठी आशा वर्करांना जबाबदार ठरवले जाऊ नये, आशा वर्करचा विमा पालिकेने काढावा, अशा विविध मागण्यांसाठी मंगळवारी धरणे आंदोलन केले होते.