उरण : चिरनेर येथील पूर स्थितीच्या वेळी कर्तव्यावर असतांना सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल राजवाडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना त्वरित मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलीस विभागाला दिले आहेत.
उरण पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल राजवाडे उरण मधील चिरनेर भागात पुरग्रस्तांना मदत करत होते. त्याचवेळी त्यांना ह्दयविकाराचा तीव्र झटका आला त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा >>>मुंबईत मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वेवरील लोकल ट्रेनची स्थिती काय? पावसाचा जोर वाढला, रेल्वेने दिली माहिती
पोलीस परिवार या संस्थेनं हा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नेला असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांच्याशी संपर्क साधत विशाल राजवाडे यांचा कर्तव्यांवार असताना मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना जेवढी शक्य असेल तेवढी मदत करा, तसेच अनुकंपतत्वावर कुटुंबातील व्यक्तीला घेण्यात येऊ शकतं का? यासाठी तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.