उरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या उदघाटन होणाऱ्या बहुप्रतिक्षित उरण – खारकोपर लोकलच्या उदघटनाची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. उरण स्थानकांत हा सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी स्थानकाची फुलांच्या माळांनी सजावट करण्यात आली आहे. तर रेल्वे विभागाने विविध प्रकारच्या स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत. गुरुवारपासूनच कार्यक्रमासाठी स्टेज तयार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे स्थानकातील उर्वरित कामेही सुरू आहेत.

हेही वाचा… पंतप्रधानांच्या स्वागताला नवी मुंबईत आगरी-कोळी परंपरेचा साज

हेही वाचा… अटल सेतूच्या शुभारंभाला ‘जय श्रीराम’चा नारा

उरणच्या नागरिकांमध्ये उत्साह

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही लोकल सेवा सुरू होत आहे. त्यामुळे उरणच्या नागरिकांमध्ये उत्साह संचारला आहे. शहरातील अनेक नागरिक उत्स्फूर्तपणे या सोहळ्याच्या तयारी पाहण्यासाठी सकाळ पासूनच उरण रेल्वे स्थानकात येऊ लागले आहेत.

Story img Loader