नवी मुंबई : नवी मुंबईतील घणसोली परिसरातील एका रस्त्यावर काही तृतीयपंथीय  भिक्षा मागत होते. मात्र येथे भिक्षा मागायची असले तर हप्ता द्या असे स्थानिक गुंडांची मागणी फेटाळताच तीन तृतीयपंथी व्यक्तींना बेदम मारहाण करत हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या असून एका आरोपीचा शोध घेतला जात आहे. 

योगेश उर्फ परशुराम नीलकंठ, प्रतीक कांबळे, व त्यांचा अन्य एक साथीदार असे यातील आरोपींची नावे आहेत.ठाणे बेलापूर मार्गावरील घणसोली स्टेशन समोर काही तृतीयपंथी भिक्षा मागून उदरनिर्वाह करतात. नेहमी प्रमाणे २ तारखेलाही तीन तृतीयपंथी व्यक्ती भिक्षा मागत असताना त्या ठिकाणी आरोपी एका दुचाकीवर आले. आरोपींनी त्या तृतीयपंथी व्यक्तींना आरोपींनी आडवले आणि या ठिकाणी भिक्षा मागायची असेल तर आम्हाला हप्ता द्यावा लागेल अशी दामटती सुरु केली. मात्र त्याला नकार देताच ज्या तृतीयपंथी व्यक्तीने नकार दिला त्याला बेदम मारहाण सुरु केली.

आणखी वाचा-‘मावळ’च्या निकालाचा धसका पनवेल भाजपच्या चाणक्यांना 

इतर तृतीयपंथी  व्यक्तींनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण केली गेली. त्यातील एकावर आरोपींनी चाकूचे वार केले. एवढ्यावर आरोपी थांबले नाहीत तर त्यांनी चाकूचा वार करून जखमी होऊन खाली  पडलेल्या तृतीयपंथी व्यक्तीचा गळा आवळून ठार करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिकार आणि आरडाओरडा सुरु झाल्याने आरोपी पळून गेले. या घटनेत  जबर जखमी झाला आहे.त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात तो बोलण्याच्या स्थितीत आल्यावर त्याचा जबाब घेत पोलिसांनी चार तारखेला गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी तातडीने कारवाई करीत आरोपींना अटक केले आहे.