अण्णासाहेब पाटील यांच्या ८९ व्या जयंती निमित्ताने रविवार दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता एपीएमसी कांदा-बटाटाबाजारातील लिलावगृहात माथाडी कामगारांचा भव्य मेळावा होणार आहे . या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा >>> हिरव्या वाटाण्याचे दर कडाडले! किरकोळ व्यापाऱ्यांसह गृहिणींची वाटाण्याकडे पाठ
मागील दोन वर्षात करोनामुळे हा मेळावा निवडक माथाडी कामगारांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला होता. मात्र आता करोनानंतर तब्बल दोन वर्षांनी जाहीर मेळावा होणार आहे. या मेळाव्यास कामगार मंत्री सुरेश खाडे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील तसेच आमदार गणेश नाईक आणि १० हजाराहून अधिक माथाडी कामगारांची उपस्थित असणार आहे. यावेळी बाजार घटक आणि माथाडी कामगारांचे विविध प्रश्न उपस्थित करण्यात येणार आहेत. एपीएमसी जीवनावश्यक वस्तूंची बाजारपेठ असल्याने करोना काळात ही बाजारपेठ निरंतर सुरू होती. त्याचबरोबर इतर बाजार घटक व माथाडी वर्ग ही अविरतपणे काम करत होता. यावेळी करोनामुळे दगावले आहेत त्यांच्या कुटूंबियांना तत्कालीन सरकारने अनुदान जाहीर केले होते . परंतु त्यांना न्याय मिळाला नाही. तसेच माथाडी कामगारांच्या घरांचाही प्रश्न प्रलंबित आहे, असे विविध प्रश्न मांडण्यात येणार आहेत.