टीम लोकसत्ता

नवी मुंबई: स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्या काँग्रेसचा निषेध करण्यासाठी आणि सावरकरांचे कार्य पुन्हा एकदा जनतेपर्यंत आणि युवा पिढी पर्यंत पोहोचवण्यासाठी नवी मुंबईमध्ये आज नवी मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. या गौरव यात्रेमध्ये हजारो सावरकर प्रेमी नागरिकांनी रणरणत्या उन्हातही सहभाग घेतला. आमदार गणेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती या गौरव यात्रेला लाभली. त्यांच्यासह माजी खासदार संजीव नाईक, ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक, नवी मुंबई महापालिकेचे माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर जयवंत सुतार यांच्यासह आदी मान्यवरांनी या गौरव यात्रेत भाग घेतला.

Sarangi maestro Pt Ram Narayan passes away
व्यक्तिवेध : पं. रामनारायण
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Video viral grandmothers dance performed on Pahun Jevla Kay song which famous for gautami patil lavani
“पाव्हणं जेवला का?” डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही”
lucky car tribute Gujarat burial ceremony for car
VIDEO : “बाईsss हा काय प्रकार! ‘लकी’ कारची जंगी अंत्ययात्रा अन् २००० लोकांत पार पडला दफनविधी; खर्च चार लाखांच्या घरात
ramdas athawale poem for pm modi
VIDEO : “पंतप्रधान मोदी आहेत पळणारा चित्ता, म्हणूनच ते…”; रामदास आठवलेंची कवितेतून फटकेबाजी!
Famous influencer Ricky Pond's stunning dance
‘राजं संभाजी’, गाण्यावर परदेशातील प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर रिकी पाँडचा जबरदस्त डान्स; Video पाहून युजर्स करतायत कौतुक
Viral Indonesian Siblings Render The Most Adorable Version Of Dhoom Track Dilbara
गिटार वाजवत मोठ्या भावाने गायले गाणे, छोट्याने किंचाळत…., इंडोनेशिअन भावाडांनी जिंकले नेटकऱ्यांचे मन, पाहा Viral Video
nashik pm Narendra modi
पंतप्रधानांच्या सभेसाठी गर्दी जमविण्याचे नियोजन, तपोवनातील मैदानावर जय्यत तयारी

वाशी येथील हॉटेल ब्लू डायमंड पासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला ढोल-ताशांच्या गजरात आणि सावरकरांच्या देशभक्तीपर गाण्यांनी शुभारंभ झाला. यात्रेत सहभागी सावरकर प्रेमींनी भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या. भगव्या पताका आणि भगव्या झेंड्यांनी वातावरण भगवेमय झाले होते. ‘ मी सावरकर’ आणि ‘आम्ही सारे सावरकर’ घोषवाक्य असलेले फलक सावरकर प्रेमींनी हातात धरले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयघोष, वंदे मातरम, भारत माता की जय, अशा घोषणा देत ही गौरव यात्रा वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पोहोचली. या ठिकाणी झालेल्या सांगता सभेमध्ये आमदार गणेश नाईक यांनी देशासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सर्वोच्च पणाला लावले. जाज्वल्य राष्ट्रभक्ती असतानाही काही प्रवृत्ती त्यांच्याविषयी अपमानजनक वक्तव्य करीत आहेत. हे आरोप करणाऱ्यांचे दुर्भाग्य आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी दिलेले योगदान कोणीही विसरू शकणार नाही असे सांगून नाईक यांनी आजच्या युवा पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांची देशभक्ती आणि मातृभक्ती याविषयीचे प्रेरणादायी विचार आणि त्यांचे कार्य समजावे यासाठी आजच्या गौरव यात्रेचे आयोजन केल्याचे सांगितले.

आणखी वाचा- नवी मुंबई: जेव्हा महाराष्ट्रातील सायकलपटू ईशान्येतील मुलांसाठी प्रेरणास्थान बनते

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान देश सहन करणार नाही असा इशारा देण्यासाठी शिवसेना, भाजपा आणि सावरकर प्रेमींनी आजची गौरव यात्रा आयोजित केल्याचे नमूद केले. स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी आणि स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याचा सन्मान केला असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी मात्र वारंवार सावरकरांचा अवमान करीत आहेत. हा अपमान आता खपवून घेतला जाणार नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आणि कार्य युवा पिढीसाठी दिशादर्शक आणि प्रेरणादायी असून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आणि कार्य आजच्या युवा पिढीसाठी दिशा देणारे आणि प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सावरकरांचा सिंहाचा वाटा तर होताच शिवाय समाज सुधारक म्हणून देखील त्यांचे कार्य मोठे आहे. अस्पृश्यता निवारण, स्वदेशीचा पुरस्कार, सदृढ समाजासाठी युवकांमध्ये व्यायाम प्रसार आणि प्रचार या विषयात त्यांनी क्रांतिकारी कार्य केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल गैरसमज पसरविण्याचे काम काही प्रवृत्ती करीत आहेत. त्याचे खंडन केले पाहिजे.

आणखी वाचा- नवी मुंबई महापालिका मालामाल, यंदा ६३३.१७ कोटी रक्कमेची विक्रमी वसुली

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आणि कार्य कोणी पुसण्याचा विचार केला तरी ते शक्य नाही. काही पक्ष घाणेरडे राजकारण करीत आहेत स्वातंत्र्याचा इतिहास माहित आहे.त्यामुळे सावरकरांचा अपमान यापुढे कधीही खपवून घेतला जाणार नाही असा नाईक यांनी दिला.