महाराष्ट्र सेवा संघ, ऐरोली शाखा, नवी मुंबईच्या वतीने शनिवार, १२ डिसेंबर रोजी सायकांळी ६.३० वाजता कथा, कवितांमधून प्रेक्षकांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे. साने गुरुजी कथा मालिकेत उत्कृष्ट कथा निवेदक पुरस्कार प्राप्त तथा मुंबई महानगरपालिका आदर्श शिक्षक पुरस्कार सुप्रसिद्ध कवी व लेखक एकनाथ आव्हाड कथा व कवितांमधून प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. प्रवेश सर्वासाठी विनामूल्य आहे.
उत्सव नात्यांचा
महाराष्ट्र सेवा संघ, ऐरोली शाखेच्या मैत्री महिला विभागाच्या ११ व्या वर्धापन दिन सोहळयानिमित्त उत्सव नात्यांचा कार्यक्रम १९ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन मनीषा कोंडसकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रवेश विनामूल्य आहे. कार्यक्रमामध्ये कथा, कविता, नाटिका, नृत्य यापैकी कोणत्याही माध्यमातून महिलांनी आयुष्यातील नात्याबद्दल सांगावयाचे आहे. त्यांनी वर्धापन दिनाच्या समारंभाला याचे सादरीकरणाची संधी मिळणार आहे. तरी ज्यांना यामध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी महाराष्ट्र सेवा संघ कार्यालयात नोंद करावी. अधिक माहितीसाठी संपर्क – २७७९१८३७, २७७९०८३६.