उरण : तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत अंतर्गत रस्ते येत आहेत. यातील दास्तानफाटा ते चिरले ,जासई ते गव्हाण मार्गावरील अवजड वाहतुकीमुळे रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडल्याने दुरावस्था झाली आहे. त्यामुळे हे मार्ग वाहतुकीला धोकादायक बनले आहेत. या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जेएनपीटी बंदराच्या अनुषंगाने आयात – निर्यातीसाठी तालुक्यातील विविध गावांच्या हद्दीत खाजगी गोदामे,एम.टी. गोदाम उभारण्यात आले आहेत. त्यातील बहुतांशी गोदामे ही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्याला लागून वसविण्यात आली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराच्या माध्यमातून बनविण्यात आलेले रस्ते अवजड वाहतुकीच्या अनुषंगाने रस्त्याचा दर्जा योग्य नसल्याने गोदामात येणाऱ्या मालाचे अवजड कंटेनर ट्रेलर वाहतुकीमुळेच रस्त्याला खड्डे पडत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ठेकेदारामार्फत चिर्ले येथील रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र अतिवृष्टी आणि अवजड वाहतुकीमुळे रस्ताच शिल्लक राहिला नाही.आजही हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे .

हेही वाचा: नवी मुंबई : ४ दशकांपासून प्रलंबित प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा प्रश्न निकाली, दरही कमी केले

तसेच चिर्ले ते दास्तान या दरम्यान रेल्वेच्या पुलाचे काम सुरू असल्याने आणि अवजड वाहतुकीमुळे या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ठेकदारामार्फत पर्यायी रस्ता प्रवाशांच्या सेवेसाठी बनवायचा असताना रस्ताच शिल्लक राहिला नसल्याची स्थिती आहे.
तर जासई- गव्हाण रस्त्याच्या दुरुस्ती साठी अनेकांनी आंदोलन ही केली आहेत .ह्या मार्गावर विविध कंपन्या चे एम टी यार्ड अनेक क्रशर प्लांट असल्याने मोठी अवजड वाहतूक होत आहे.तसेच डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन नसल्याने पावसाळ्यात सर्व पाणी रस्त्यावरच साचते त्यामुळे हा मार्ग खराब होतो .

हेही वाचा: नवी मुंबई : माजी खासदार राजू शेट्टी यांनी जाणून घेतल्या एपीएमसीतील बाजारातील व्यापाऱ्यांच्या समस्या

आज ही या रस्त्यावर मोठं मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. कोणीही या रस्त्याला वाली उरला नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या मार्गांवरील रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. चिर्ले येथील रस्त्यासाठी संबंधित ठेकेदाराला दुरुस्ती करण्यासाठी पत्र दिलेले आहे.ते करून घेतले जाईल मात्र जासई गव्हाण रस्त्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. त्यासाठी निधी नसल्याने ते थांबले आहे.तात्पुरते खड्डे भरून लेव्हल केले जातील अशी माहिती उरणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता नरेश पवार यांनी दिली.