नवी मुंबई महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त ३ जानेवारी १६ रोजी पालिका क्षेत्रातील महिला व बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नोंदणीकृत महिला संस्था, महिला मंडळ यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याकरिता पालिका क्षेत्रातील महिला मंडळे, संस्था यांच्याकडून पुरस्कारासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सर्व विभाग कार्यालयात तसेच योजना विभाग सीबीडी येथील पालिका मुख्यालयात उपलब्ध आहे. पुरस्काराकरिता सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्थांनी २३ डिसेंबपर्यंत अर्ज सादर करावयाचे आहेत.
त्याचप्रमाणे पालिकेतर्फे विविध स्पर्धाचे आयोजनदेखील करण्यात आले आहे. रांगोळी स्पर्धा ही विभाग स्तरावर घेण्यात येत असून यामध्ये फ्री हॅन्ड, निसर्गचित्र, देशभक्तीपर रांगोळी हे विषय आहेत. या स्पध्रेकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ डिसेंबर आहे. त्याचप्रमाणे भाताचे विविध प्रकार या विषयावर पाककला आणि सॅलेड सजावट स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेकरिता ३० डिसेंबपर्यंत अर्ज करायचे आहेत. तसेच निबंध स्पध्रेकरिता २८ डिसेंबपर्यंत अर्ज सादर करावयाचे आहेत. या स्पध्रेमध्ये नवी मुंबई पालिका क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या महिलाच सहभागी होऊ शकतात. या अनुषंगाने महिला मंडळे महिला बचत गट यांनी उत्पादित केलेल्या साहित्याची विक्री करण्यासाठी विनामूल्य स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याकरिता ३० डिसेंबपर्यंत अर्ज सादर करावयाचे आहेत. अधिक माहितीकरिता संपर्क ०२२-२७५६३५०५.