लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पनवेल: तळोजा औद्योगिक वसाहतीमधील सुरक्षेच्या जनजागृतीसाठी बुधवारी सकाळी उद्योजकांनी एक पाऊल पुढे टाकत फेरी काढली. यामध्ये उद्योजक आणि उद्योगांचे प्रतिनिधी आणि कामगार संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी या फेरीला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर फेरीची सुरुवात झाली.

४ ते ११ मार्च या दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. या निमित्ताने तळोजा मॅन्युफॅक्चरर्स असोशिएशन (टी.एम.ए.) आणि रायगड औद्योगिक आरोग्य व सुरक्षा विभाग आणि म्युचल एड रिस्पोन्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वॉकेथॉन’ या सुरक्षा फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे पाचशेहून अधिकजणांनी या फेरीत सहभाग घेतला. गेल्या वर्षी विविध कारखान्यांमध्ये आग लागण्याच्या आणि वायू गळतीच्या किरकोळ घटना घडल्या होत्या. यामुळे कामगार वर्गात सुरक्षेसाठी आणि उद्योजकांना उपाययोजनांसाठी जनजागृतीसाठी ही फेरी काढण्यात आली.

आणखी वाचा- नवी मुंबई: जागतिक महिलादिनी उरणमध्ये महागाई विरोधी निदर्शने

आय.जी.पी.एल. कंपनीकडून सुरु झालेली सुरक्षा फेरी टी.एम.ए.च्या कार्यालयाजवळ अग्निशमन केंद्रापर्यंत काढण्यात आली. या फेरीमध्ये सहभागी झालेल्यांना अमूल कंपनीने ताक आणि पाण्याची सोय केली होती. सुरक्षेविषयी विविध फलक हातात घेऊन आणि विविध सुरक्षेपर घोषणांनी काही काळ औद्योगिक क्षेत्र दुमदुमून गेले होते. उत्कृष्ट फलकावरील घोषवाक्याला बक्षिसे देण्यात आले. आपत्तीवेळी काय करावे या विषयी फेरीत जनजागृती करण्यात आली.

आणखी वाचा- देशी कट्टा प्रकरणी दोन अटक

जागतिक महिला दिन असल्याने औद्योगिक क्षेत्रातील ३० महिलांचा येथे सत्कार करण्यात आल्याची माहिती टीएमएचे अध्यक्ष शेखर श्रुंगारे यांनी दिली. यावेळी तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जितेंद्र सोनावणे, टीएमएच्या कार्यकारीणीतून सदस्य मोठ्या संख्येने फेरी यशस्वी करण्यासाठी उपस्थित होते.