पनवेल: दुर्गाष्टमीचा उत्सव पनवेल परिसरात सर्वत्र सूरु असताना महाराष्ट्र भूषण जेष्ठ निरुपनकार नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयातील शवागारामधील दर्पामुळे पनवेलचे रहिवाशी हैराण झाले आहेत. ही दुर्गंधी असह्य करणारी आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या हाकेवर असणा-या इमारतीमधील रहिवाशांना अक्षरशा दरवाजे खिडक्या बंद करुन रहावे लागते. मागील चार दिवसांपासून शवांना दर्प सुटला असून या मार्गावरुन येजा करणा-या प्रत्येकाला हा बैचेन करणारा दर्प घेऊनच येथून येजा करावी लागते. रुग्णालयातील शवपेटींची संख्या सहा आणि मृतदेह १० तसेच शवागाराचा बंद असलेली वातानुकुलीत यंत्रणेचे हवा थंड करणारे यंत्र बंद असल्याने ही वेळ पनवेलकरांवर ऐन दुर्गाष्टमीच्या काळात आली आहे.
पनवेल शहरातील महाराष्ट्र भूषण जेष्ठ निरुपनकार नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात ३० मृतदेह एकाच वेळी ठेऊ शकतील एवढी क्षमता असलेले शवागार बांधण्याचे काम अंतिम टप्यात आहे. शवविच्छेदन खोलीमधील वातानुकूलीत यंत्रणा चालू करण्याचे काम सुरु आहे. मात्र अजून ही कोणतीच कामे पुर्ण झालेले नाहीत. अशा स्थितीमध्ये या रुग्णालयातील ७० आरोग्य कर्मचारी, ७० रुग्ण आणि रुग्णालयाशेजारी राहणारे शेकडो रहिवाशी यांना ऑक्टोबरच्या वाढलेल्या तापमानात घरांची खिडक्या कशा उघडाव्यात असा प्रश्न पडला आहे. रुग्णालयातून येणाऱ्या असह्य दर्पामुळे पनवेलकर वैतागले आहेत. सध्या उपजिल्हा रुग्णालयात असणारी १० मृतदेह बेवारस आहेत. मागील १० ते १५ दिवसांपासून या मृतदेहांच्या वारसदारांचा शोध पोलीस लावू न शकल्याने हे मृतदेह येथेच एकावर एक ठेवले आहेत.
हेही वाचा… उरणमध्ये शारदोत्सवात गावदेवींचा जागर तर घरोघरी पारंपरिक घटस्थापना
क्षमतेपेक्षा अधिक मृतदेह असल्याने आणि तालुक्यात एकाच ठिकाणी मृतदेह ठेवण्याची सरकारी व्यवस्था असल्याने पोलीस व आरोग्य यंत्रणेने करावे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्णालयाच्या तळमजल्यावर शवागाराचे नियोजन करणारी आधुनिक इमारत रचनेची मांडणी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केली. अशी वास्तु असलेली ही राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचा हे पहिलेच रुग्णालय आहे. शवागारात पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मृतदेहांची संख्या ४ असल्याने मृतदेह लवकर कुजत चालले आहेत. वाढलेल्या तापमानामुळे आणि कुजलेल्या मृतदेहांचा दर्प हवेच्या वेगाने रुग्णालय परिसरातील घराघरातील रहिवाशांना झोपू देत नाही.
हेही वाचा… ऑक्टोबरच्या उन्हात अंगाची काहिली शमविणारे ताडगोळे उरणच्या बाजारात; आगमनाला दर चढे
आ. प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक आरोग्य यंत्रणा तोकडी पडल्याने काही दिवसांपूर्वी या रुग्णालयाच्या अंतर्गत स्वच्छतेची जबाबदारी घेतली होती. मंगळवारी आ. ठाकूर यांनी डॉक्टरांच्या उपस्थितीत रुग्णालयाच्या स्वच्छतेचा आढावा घेतला. आ. ठाकूर यांनी रुग्णलयात अंतर्गत स्वच्छतेसाठी १० कामगार दिल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मधुकर पांचाळ यांनी दिले. अतिरीक्त मिळालेले कामगार फरशा व परिसर स्वच्छ करत आहेत.
मागील चार दिवसांपासून शवागारात बेवारस मृतदेह कुजल्यामुळे, अचानक शवागाराच्या वातानुकुलीत यंत्रणेचा एक्झोस बंद झाल्याने आणि त्याच दरम्यान वाढलेल्या तापमानामुळे परिसरात अधिक दर्प सुटल्याच्या तक्रारी येत आहेत. आम्ही आतापर्यंत दोन वेगवेगळ्या तांत्रिक कंपन्यांच्या तज्ञांकडून वातानुकुलीत यंत्रणेची दुरुस्ती करुन घेतली सध्या सुद्धा काम सुरू आहे मात्र अद्याप काम पुर्ण झालेले नाही. लवकरच या यंत्रातील बिघाड दूर केला जाईल. नवीन शवविच्छेदन खोली बांधण्याचे काम सूरु आहे. शवपेटींची संख्या या नव्या खोलीत अधिकची केली आहे. तोपर्यंत इतर रुग्णालयात मृतदेह ठेवता येतील का याबाबत प्रयत्न आमचे सूरु आहेत. – डॉ. मधुकर पांचाळ, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, पनवेल</p>