नवी मुंबई महानगरपालिकेचा २०२३- २४ या आर्थिक वर्षासाठी शिलकी अर्थसंकल्प पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सादर केला. ४९२५ कोटी कोटी जमा आणि कोटी खर्च असलेला हा अर्थसंकल्प सरते शेवटी दोन कोटी ५० लाख रुपये शिल्लक ठेवणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने गेल्या वर्षी ४९१० कोटी रुपयांत रुपये जमा व खर्चाचा अर्थसंकल्प सादर केला होता. यात केवळ बारा कोटी रुपयांची वाढ झालेली दिसून येत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेला मालमत्ता कर वसुली मधून यंदा ८०१ कोटी रुपये अपेक्षित आहेत. तर राज्य शासनाकडून मिळणाऱ्या स्थानिक संस्था कर सहाय्यक अनुदाना पोटी यंदा पंधराशे सहा कोटी मिळण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा- नवी मुंबई : अंमली पदार्थ विक्री प्रकरणी पुन्हा नायझेरियन कनेक्शन; दोघांना अटक
शहरांमध्ये पुनर्बांधणी प्रकल्प संख्या वाढत असल्याने विकास शुल्क या सदराखाली पालिकेला ३६० कोटी रुपये मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. या दोन प्रमुख उत्पन्न स्तोत्र व्यतिरिक्त पालिकेला जन सायकल सहभाग प्रणाली पाणीपुरवठा, विविध प्रकारचे परवाने यातून या सर्व संवर्गातील चार हजार ९२२ कोटी रुपये मिळणार आहेत. पालिकेला मिळणाऱ्या या उत्पन्नातून स्थापत्य कामे परिवहन बस स्थानक विकास, नाले व होल्डिंग यांची कामे सायन्स पार्क विकास, दिवाबत्ती सुधारणा व्यायाम शाळा समाज मंदिर वाचनालय मंगल कार्यालय ग्रंथालय विद्युत गॅस वाहिनी क्रीडा संकुल, मैदानी विकास, दिव्यांगांसाठी मैदाने, नाट्यगृह, तरण, तलाव दवाखाने, शाळा, सौर ऊर्जा व जलविद्युत प्रकल्प, मोरबे धरण विकास, अमृत योजना, पर्यावरण, सीसीटीव्ही कॅमेरे उभारणे, घनकचरा व्यवस्थापन, उद्यान विभाग, पालिकेच्या आरोग्य सुविधा उभारणे, आरटीपीसीआर लॅब अपंग शिक्षण प्रशिक्षण सेवा सुविधा, नेरूळ व बेलापूर येथे दिव्यांग काळजी केंद्र त्याचप्रमाणे खेळाडूंसाठी प्रशिक्षण वर्ग क्रीडा व सांस्कृतिक विभागाचा विकास, तृतीयपंथी व्यक्तींसाठी स्वतंत्र कक्ष, ज्येष्ठ नागरिक निवारा केंद्र, आदिवासी घटकांसाठी विविध उपाय योजना, शरीर विक्रीय करणाऱ्या महिलांसाठी काही योजना, अग्निशमन दलाचा दलामध्ये नवीन वाहनांची भरती, त्याचप्रमाणे नवी मुंबईतील शिक्षण विभागाचा विविध पद्धतीने विकास करण्यासाठी पालिका दहा कोटी खर्च करणार आहे.
हेही वाचा- नवी मुंबई: सायकल ट्रॅकमध्ये इको फ्रेंन्डली साहित्य वापराच्या सूचनेची बोळवण?
पालिकेची परिवहन सेवा सक्षम करण्यासाठी २७४ कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे वेळप्रसंगी येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीसाठी आपत्ती व्यवस्थापन अशा सर्व खर्चावून वर पालिका यंदा चार हजार ९२२ कोटी रुपये खर्च करणार असून शेवटी दोन कोटी ५० लाख शिल्लक ठेवणार आहे. नवी मुंबई महापालिकेने यंदा जुन्या प्रकल्पांना प्राधान्य देताना नवीन प्रकल्प प्रकल्प हाती घेतलेले नाहीत. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प हा दरवर्षीप्रमाणे मागील पानावरून पुढे सुरू अशा प्रकारात मोडणार आहे.
हेही वाचा- कोणतीही करवाढ नसलेला नवी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प
हवा प्रदूषण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हिरवळ निर्माण करण्याचे नियोजन आहे. शिवाय शहरातील उद्यानांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. यासाठी अर्थसंकल्पात ३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे . यावेळी वृक्ष प्राधिकरणाचा ४४.७०कोटी खर्चाचा व जमा ४५.८०कोटींचा अर्थसंकल्प सादर व मंजूर करण्यात आला.