‘आपला दवाखाना’ची वेळ दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत

नवी मुंबई- महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे ऑनलाइन लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते तसेच उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस व आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत मान्यवरांच्या ऑनलाइन उपस्थितीत व प्रत्यक्षात आयुक्त राजेश नार्वेकर पालिका अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. राज्यभरात महाराष्ट्र दिनाला  सुरू करण्यात आलेल्या ३१७ आपला दवाखान्यांमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कौल आळी, घणसोली येथील आपल्या दवाखान्याची सुरुवात झाली. या दवाखान्यामध्ये एलईडी स्क्रीनवर ऑनलाइन लोकार्पण समारंभाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. तर आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभ हस्ते घणसोली येथील ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे उद्घाटन अनौपचारिकरीत्या फीत कापून करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> महाराष्ट्र दिनानिमित्त नवी मुंबई पालिका मुख्यालयात ध्वजारोहण; कामगार दिनाचे औचित्य साधून कामगारांचाही सन्मान

आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सर्वसामान्य लोकांना उत्तम आरोग्य सुविधा त्यांच्या कामाच्या वेळेचा विचार करून उपलब्ध करून देण्याचा हा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले. कष्टकरी श्रमिकांना अनेकदा आपल्या कामाच्या वेळेत औषधोपचारासाठी दवाखान्यात जाणे शक्य होत नाही, त्यामुळे त्यांच्या कामाच्या वेळेनंतरही त्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून या ‘आपला दवाखान्या’ची  वेळ दुपारी  २ पासून रात्री १० वाजेपर्यंत लोकांना सुविधाजनक अशी दिलासा देणारी असल्याचे सांगितले. ‘आपला दवाखाना’ अंतर्गत बाह्यरुग्ण सेवा, मोफत आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार, टेलिकन्सल्टेशन, मल्टी स्पेशालिटी, गर्भवती मातांची तपासणी, महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, एक्स-रेसाठी संदर्भ सेवा अशा विविध सात प्रकारच्या सेवा उपलब्ध होणार असल्याचे  सांगितले. त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार सात प्रकारच्या तज्ज्ञसेवाही उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा >>> एपीएमसीतील मान्सूनपूर्व कामांचा बोजवारा; संचालक मंडळ नसल्याने धोरणात्मक कामे रेंगाळली!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करोनामुळे आरोग्य व्यवस्था सक्षमीकरणाचा धडा आपण शिकल्याचे सांगितले. तर आयुक्तांनी करोना काळात नवी मुंबई महानगरपालिकेनेही आपल्या आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणाकडे विशेष लक्ष दिल्याचे सांगितले.

‘आपला दवाखाना’बरोबरच शहर आरोग्यवर्धिनी केंद्र

महाराष्ट्रदिनी घणसोली येथे सुरू झालेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ प्रमाणेच दिवाळेगाव आणि शिरवणे, जुईनगर या ठिकाणीही शहर आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यात आले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thackeray aapla dawakhana launched at kaul ali ghansoli on maharashtra day zws
Show comments