पूनम सकपाळ 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई</strong> : आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारी साधी केळी त्याचबरोबर विशेषतः वेलची केळीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात अवकाश पाऊसाने उत्पादनाला फटका बसत असून उत्पादनात घट होत आहे तसेच मागणी वाढल्याने निर्यात ही वाढली आहे त्यामुळे साधी केळी प्रतिडझन १०-२०रुपयांनी तर वेलची केळी ३०ते ४० टक्यांनी वधारली आहेत.

एपीएमसी बाजारात सोलापूर, कर्नाटक तमिळनाडू आणि अत्यल्प प्रमाणात वसईची केळी दाखल होत आहेत. परंतु सध्या बाजारात अवकाळी पावसाने उत्पादन घटत असून मोठ्या प्रमाणावर दर्जेदार केळींची निर्यात वाढत आहे. तसेच इंधन दरवाढ त्यामुळे वाहतूक खर्च वाढत असल्याने दरवाढ होत आहे अशी माहिती घाऊक व्यापाऱ्यांनी दिली आहे. एपीएमसी बाजारात दररोज १५-२०ट्रक आवक होती परंतु बाजारात आवक घटली असून अवघ्या ५-६गाड्या दाखल होत आहेत. घाऊक बाजारात आधी ५० ते ६० रुपये प्रति किलो दराने उपलब्ध असलेली केळी आता ७०-७५ रुपयांनी विक्री होत आहे. तसेच साधी केळी आधी ३०-४०रुपये डझन उपलब्ध होती ती आता ५०-६० रुपयांनी उपलब्ध आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा केळीचे दर खूपच वाढले आहेत. कामगार खर्च, इंधन दरवाढ त्यामुळे दर वाढले आहेत. शिवाय अवकाळी पावसाने उत्पादनाचे नुकसान होत आहे. परिणामी उत्पादन घटले आहे. तसेच दर्जेदार केळींची निर्यात ही दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे ३०%-४०% दरवाढ झाली आहे.

-संतोष सुर्वे, घाऊक व्यापारी, एपीएमसी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Banana expensive exports increased production also decreased increase in banana prices ysh