नवी मुंबई : गाडी भाड्याने देण्यासाठी आता अ‍ॅपचाही वापर केला जातो. मात्र अनेकदा त्याचा मनस्ताप सहन करावा लागतो. असाच प्रकार नवी मुंबईत समोर आला असून गाडी ज्यांना भाड्याने दिली त्यांनी गाडी परत केलीच नाही. या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

रमेश राजपूत आणि झुमकार अ‍ॅपचे संचालक यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील फिर्यादी मानसी द्विवेदी या उलवे येथे राहत असून त्यांनी आपल्या गाडीची नोंदणी झुमकार या अ‍ॅपवर केली आहे. ज्यांना भाड्याने गाडी हवी आहे असे ग्राहक याच अ‍ॅपद्वारे ओळखपत्र आणि करारपत्र करून गाडी भाड्याने घेऊ शकतात. अशाच प्रकारे मानसी यांची गाडी १४ जुलैला रमेश राजपूत यांनी बुक केली. मात्र ठरलेल्या दिवशी त्यांनी गाडी परत केलीच नाही. या बाबत राजपूत यांना विचारणा केली असता राजपूत  यांनाही झुमकार वर आपल्या गाडीची नोंद केली होती. मात्र गाडीचे नुकसान झाले हे नुकसान झुमकार भरून देत नाही. त्यामुळे  प्रकरण जो पर्यंत संपत नाही तो पर्यंत गाडी देणार नाही असे मानसी यांना सांगण्यात आले. 

young girl fight with ola auto viral video
“ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Follow up of demands to candidates through manifesto from Rickshaw Panchayat before elections
रिक्षाचालकांच्या मागण्या ऐरणीवर! निवडणुकीच्या तोंडावर रिक्षा पंचायतीकडून जाहीरनाम्याद्वारे उमेदवारांकडे पाठपुरावा
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
devendra fadnavis criticize uddhav thackeray for making video of bag checking
“त्यांच्या आधी माझी बॅग तपासली, केवळ भांडवल…”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
Apple new Share Item Location feature
Share Bag Location: प्रवासादरम्यान लगेज हरवलं? आता चिंता सोडा, तुम्हाला मदत करणार शेअर बॅग लोकेशन
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त

आणखी वाचा-नवी मुंबई: पोलीस ठाणे पार्किंगमध्ये हत्ती? वाचा काय आहे प्रकार

दरम्यान मानसी या आपल्या कुटुंबियांसमवेत देवदर्शनासाठी बाहेरगावी गेल्या होत्या. परत आल्यावर त्यांनी याबाबत झुमकार अ‍ॅपशी संपर्क साधल्यावर त्यांनीही राजपूत यांनी दिलेल्या माहितीला दुजोरा दिला. तसेच लवकरात लवकर गाडी मिळवून देतो असे सांगितले मात्र आजतागायत गाडी न मिळाल्याने अखेर मानसी यांनी एनआरआय पोलीस ठाण्यात राजपूत आणि झुमकार अ‍ॅपविरोधात शुक्रवारी गुन्हा नोंद केला.