लीव्ह इन रिलेशनशीपमध्ये मित्रासोबत राहणे एका बारबालेला महागात पडले आहे. दोन वर्षांपासून ही बारबाला रिक्षाचालक मित्रासोबत करंजाडे वसाहतीमध्ये राहत होती. करंजाडे वसाहतीमधील सेक्टर ६ येथील गणेश प्लाझा कॉ. ॲप सोसायटीमध्ये या बारबालेवर मित्रानेच हाताबुक्याने मारहाण केली. मध्यरात्री इमारतीच्या वाहनतळात बारबालेला बेदम मारहाण झाल्याने तीने रिक्षाचालक मित्राविरोधात थेट पोलीस ठाणे गाठले. पनवेल शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>नवी मुंबई: शीव-पनवेल महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक; एका महिलेचा मृत्यू

मुदतशीर बशीर राऊत असे या रिक्षाचालक मारहाण करणा-या मित्राचे नाव असून तो पनवेल शहरातील पटेल मोहल्ला येथे राहतो. पोलीसांनी बारबालेच्या तक्रारीनंतर मुदतशीर याला नोटीस बजावली आहे. मुदतशीर व बारबालेची मैत्री घट्ट होती. मात्र गुरुवारी मुदतशीरला न सांगता बारबाला नेरुळ येथे गेली. मात्र तीने मुदतशीरला संपर्कच केला नाही. अखेर रात्री ती घरी परतल्यानंतर संतापलेल्या मुदतशीरने तीला हाताबुक्याने मारहाण करुन शिविगाळ केली. पोलीसांनी या प्रकरणी पुन्हा तंटा न करण्याची सूचना मुदतशीरला केली आहे.