राज्य निवडणूक आयोगाकडे गंभीर तक्रार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साडेतीन लाख मतदारसंख्या असलेल्या नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघात तब्बल २१ हजार ६९६ मतदार बोगस असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे एका मतदाराची तीन ते चार बुथमध्ये नोंदणी असून काही मतदारांनी एकच छायाचित्र वापरून वेगवेगळ्या नावाने नोंदणी केलेले आहे. या यादीत पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मतदारांची दुबार तसेच तिबार नाव नोंदणी झालेली आहे. नवी मुंबईत एक लाखापेक्षा जास्त माथाडी कामगार राहात असून या मतदारांनी जन्मभूमी आणि कर्मभूमीत मतदार नोंदणी कायम ठेवली आहे.

या सर्व बोगस मतदारांच्या नोंदणीची गंभीर तक्रार नवी मुंबई भाजप व शिवसेनेने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

देशातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ असलेल्या बेलापूर मतदारसंघाचे दहा वर्षांपूर्वी विभाजन होऊन पाच मतदारसंघ तयार झाले आहेत. त्यात नवी मुंबईत ऐरोली व बेलापूर हे दोन विधानसभा मतदारसंघ असून मूळ बेलापूर मतदारसंघाचे नाव येथील बेलापूर गावामुळे कायम ठेवण्यात आलेले आहे. बेलापूर मतदारसंघात माजी मंत्री गणेश नाईक यांना कात्रजचा घाट दाखवत भाजपाच्या मंदा म्हात्रे विजयी झालेल्या आहेत. येथे झालेल्या तिरंगी लढतीत शिवसेनेच्या विजय नाहटा यांनीही या दोघांना टक्कर देण्याचा प्रयत्न केला. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ही तिरंगी लढत कायम राहणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघाची मतदार संख्या ३ लाख ६० हजार होती. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात राज्य निवडणूक आयोगाने ऑक्टोबरअखेपर्यंत मतदार संक्षिप्त पुनर्नोदणी सरू केली आहे. त्यामुळे आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी कशी होईल यासाठी राजकीय पक्ष प्रयत्नशील आहेत. यात जानेवारीमध्ये १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणाईला मतदानाचा हक्क देण्यासाठी काही कार्यकर्ते उत्साही आहेत. राज्य निवडणूक आयोगाने नुकतीच प्रसिद्ध केलेल्या बेलापूर मतदारसंघाच्या मतदार यादीत २१ हजार ६९६ बोगस मतदारांची बोगस नोंदणी झाल्याचे आढळून आले आहे. यातील पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागात राहणाऱ्या काही रहिवाशांचे नाव तेथील मतदारसंघातही कायम असून बेलापूर मतदारसंघातही त्यांचे नाव वगळण्यात आलेले नाही. वास्तविक देशात एका मतदारसंघात नाव असल्यास दुसऱ्या मतदारसंघातील नाव निवडणूक आयोगाच्या विशिष्ट संगणकप्रणालीमुळे बाद होत असते. मात्र बेलापूर मतदारसंघात ते झालेले नाही. ही संख्या कमी- अधिक नसून थेट १६ हजार ८० मतदारांची आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे धाबे दणाणले आहेत. ही दुबार व तिबार मतनोंदणी कोणी केली? याबाबत सर्वच राजकीय पक्ष एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. याची गंभीर तक्रार शिवसेना व भाजपच्या स्थानिक नेत्यांनी राज्य निवडणूक आयोग व दक्षता विभागाकडे केली असून या नावाचे पुनर्परीक्षण केले जाणार आहे.

एकच मतदाराचे तीन बुथमध्ये नाव

नेरुळ येथे राहणाऱ्या प्रियांका बापूसाहेब कदम या महिला मतदाराचे नाव येथील बुथ क्रमांक २५६, २४३ आणि २४४ या तीन यादीत आहे. हीच स्थिती बेलापूर येथे राहणाऱ्या सुनीता भरत पाटील यांचे नाव सेक्टर १,४ व ८ या बुथ क्रमांकातील यादीत आहे. ऐरोलीतील काही मतदारांची नोंदणी ही सानपाडा येथील बुथमध्ये करण्यात आलेली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी केवळ कार्य आणि प्रतिमा आवश्यक नसून अशा प्रकारे दुबार आणि तिबार बोगस नोंदणी देखील करण्याची आवश्यकता आहे अशी चर्चा सुरू आहे.

एकाच छायाचित्रावर ही नोंदणी वेगवेगळ्या नावाने करण्यात आली आहे. निकोप वातावरणात निवडणुका व्हाव्यात यासाठी या मतदार यादीचे पुनíनरीक्षण करण्यात येऊन बोगस मतदारांची नावे वगळण्यात यावीत अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

– नीलेश म्हात्रे, सरचिटणीस, भाजप, नवी मुंबई</p>

बेलापूर विधानसभा मतदारसंघात मोठय़ा प्रमाणात दुबार मतदारांची नोंदणी झालेली आहे. त्यांची तक्रार पुराव्यानिशी निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेली आहे. आमच्या पक्षाने अशी १८ हजार मतदारांची यादी काढली आहे. निवडणूक आयोगाकडून यावर कारवाईची अपेक्षा आहे.

-विठ्ठल मोरे, जिल्हाप्रमुख, शिवसेना, नवी मुंबई (दक्षिण)