नवी मुंबई : बेलापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ( शरद पवार) संदीप नाईक यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी भाजपमध्ये प्रवेश करत महाविकास आघाडीला धक्का दिला. कौशिक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि वाशीतील माजी नगरसेवक राजू शिंदे यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

दरम्यान कौशिक यांनी पक्ष सोडल्यामुळे काँग्रेस पक्षाला कोणताही धक्का बसलेला नाही असे म्हणत पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वाशीतील काँग्रेस भवनाबाहेर एकत्र येत रस्त्यावर फटाके फोडून आनंद व्यक्त केला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाला अधिक मजबूत करण्याबाबत निश्चय केला. निवडणुकीत पक्षाला सोडून गेलेल्यांना धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आणू असा एकमताने संकल्पही यावेळी करण्यात आला. ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भाजप मध्ये प्रवेश केल्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे कौशिक आणि शिंदे यांच्या मुळ प्रभागातील राजकीय गणिते बिघडली होती. वाशी सेक्टर १७ येथील संदीप नाईक समर्थक माजी नगरसेवक संपत शेवाळे राष्ट्रवादीत आल्याने त्यांचे विरोधक असलेले कौशिक नाराज होते. वाशी सेक्टर १६ येथील माजी नगरसेवक विजय वाळुंज हेदेखील संदीप यांच्यासह महाविकास आघाडीचे घटक झाल्याने राजू शिंदे अस्वस्थ होते. कौशिक, शिंदे गेले काही दिवस भाजप श्रेष्ठींच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. अखेर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर या दोघांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या समवेश भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे या प्रवेशादरम्यान बेलापूरच्या भाजप उमेदवार मंदा म्हात्रे मात्र उपस्थित नव्हत्या.

Eknath shinde shivsena
नवी मुंबईत शिंदे शिवसेनेचे बंड कायम; ऐरोलीत विजय चौगुले, तर बेलापूरमध्ये विजय नहाटा रिंगणात
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Vijay chougule vs bjp ganesh naik
ऐरोलीतील बंडाला नाईक विरोधकांची साथ, उमेदवारासह नेतेही नॉट रिचेबल
Heena Gavit Resigns from BJP
Heena Gavit : भाजपाला मोठा धक्का, हिना गावितांचा पक्षाला रामराम; अक्कलकुव्यात शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
uran vidhan sabha election 2024
उरण विधानसभेची तिरंगी लढत निश्चित, भाजपा, शिवसेना, शेकाप यांच्यात चुरस
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!

हेही वाचा : ऐरोलीतील बंडाला नाईक विरोधकांची साथ, उमेदवारासह नेतेही नॉट रिचेबल

काँग्रेस कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष

दरम्यान अनिल कौशिक पक्षातून गेल्याबद्दल वाशी येथील काँग्रेस भवनाबाहेर काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रित येत फटाके फोडत जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेसचे नवी मुंबई प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी भवनाच्या दरवाजाचे टाळे काढून भवनात लावण्यात आलेल्या बॅनरवरून अनिल कौशिक यांचा फोटो फाडून फेकला. तर, युवानेते अनिकेत म्हात्रे यांनी लिंबू मिरची बांधून भवनाची प्रतिकात्मक नजर उतरवल्याचेही दिसून आले. यावेळी काँग्रेस भवनमध्ये जमलेल्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत, पक्षाला अधिक मजबूत करण्याचा निश्चय व्यक्त केला. तसेच निवडणुकीत पक्षाला सोडून गेलेल्यांना धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आणू असा एकमताने संकल्प केला आहे.

Story img Loader