राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लाभार्थी कुटुंबासाठी स्वस्त धान्य देण्यात येते.मात्र सदर धान्य घेण्यासाठी नागरिक गेले असता त्यांची शिधापत्रिका संगणकीय प्रणाली त बंद दाखवत असल्याने नवी मुंबईतील शेकडो लाभार्थी धान्यापासून वंचित राहत आहेत.
हेही वाचा- “भाजपाचे हिंदुत्व ढोंगी”; राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांची टीका
राष्ट्रीय अन्न सुरक्षा २०१३ या कायद्यांतर्गत नागरिकांना तीन रुपये किलोने तांदूळ तर दोन रुपये किलोने गहू दिले जातात. मात्र, सदर योजनेचा लाभ हा वार्षिक ६० हजार च्या आत उत्पन्न असलेल्या लाभार्थी कुटुंबानच ग्राह्य आहे.आणि त्यासाठी शिधा पत्रिका मधील सर्व सदस्यांचे आधार कार्ड आधार क्रमांकानुसार नोंद करून घेतली असून पॉझ मशीनमध्ये आरसी नंबर केली आहे. मात्र, असे लाभार्थी धान्य घेण्यास जेव्हा शिधावाटप दुकानात जातात तेव्हा त्यांची शिधापत्रिका बंद असल्याचे दुकानदारांमार्फत सांगण्यात येते. त्यामुळे नवी मुंबईतील अशा शेकडो शिधापत्रिका धारकांना आज स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.
हेही वाचा- ठाणे महापालिका मुख्यालयाजवळच रस्ता अडवून मंडपची उभारणी
सदर योजना सुरू झाल्यानंतर आधार कार्ड संलग्न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच आधार कार्ड संलग्न केल्यानंतर कांहीं जणांचे नाव दुबार दिसत असल्याने अशा व्यक्तींची नावे आपोआप रद्द दाखवत आहेत. त्यामुळे ज्यांची नावे दुबार दिसत आहेत त्यांनी एका ठिकाणचे नाव रद्द करून पुन्हा आधार कार्ड कार्यालयात देऊन संलग्न करावे जेणे करून त्यांना धान्याचा लाभ घेता येईल अशी माहिती वाशी शिधावाटप कार्यालयातून देण्यात आली. तर आम्ही वारंवार आधार कार्ड देऊन देखील ते संलग्न होत नसल्याने आम्हाला स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.अशी माहिती रेशनकार्ड धारक उमाशंकर उपाध्याय यांनी दिली.