पनवेल : थकीत मालमत्ता कर न भरल्याने पनवेलकरांना महापालिका प्रशासनाने लादलेल्या मालमत्ता करावरील शास्ती माफीसाठी भारतीय जनता पक्षाने राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मालमत्ता कराचा मुद्दा गाजला. भाजप नगरसेवकांनीच कर पनवेलकरांवर लादला हे पटविण्यात काहीअंशी विरोधकांना यश मिळाले. परंतु मालमत्ता करापेक्षा सर्वाधिक चर्चा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या करावरील शास्तीमाफीच्या घोषणेची झाली. आ. प्रशांत ठाकूर यांनी घोषणेपूर्वीच माजी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे शास्तीमाफीसाठी अभय योजना राबविण्याची विनंती केली होती. अजूनही अध्यादेश जाहीर न केल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू केल्याची माहिती आ. ठाकूर यांनी दिली.