उरण : राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते शुक्रवारी पिरकोन येथील आयोजित कार्यक्रमात उरण तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे खोपटा गावात उभारण्यात आलेल्या प्राथमिक शाळेच्या इमारतीच्या लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन माझ्याहस्ते होत आहे.याचा निश्चित राज्याचा मंत्री म्हणून मला अभिमान वाटत आहे.असे मत राज्याचे ग्रामविकास पंचायतराज व पर्यटनमंत्री ना.गिरीष महाजन यांनी पिरकोन येथील जाहीर सभेत बोलताना व्यक्त केले.
यावेळीउरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून डि पी वर्ल्डच्या सी आर एस फंडातून सुमारे ७ कोटी रुपये खर्च करून खोपटा गावात उभारण्यात आलेल्या रा.जि.प.च्या प्राथमिक शाळेच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा,पिरवाडी चौपाटी चे सुशोभीकरण,आवरे गावातील तलावाचे सुशोभिकरण, केगाव गावातील रहिवाशांसाठी नव्याने तयार करण्यात येत असलेला रस्ता सह इतर विकास कामाच भूमिपूजन करण्यात आले.
हेही वाचा >>>काँग्रेसचे जेष्ठ नेते गोकुळ पाटील यांचे निधन
या कार्यक्रमात शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचे खंदे समर्थक शेकापचे ज्येष्ठ नेते रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जीवन गावंड,कलावंती जीवन गावंड यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला.यावेळी व्यासपीठावर उरणचे आमदार महेश बालदी,पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजपचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत,उरण तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, महिला तालुकाध्यक्ष राणी म्हात्रे आदीजण उपस्थित होते.