उरण : ओएनजीसी प्रकल्पात काम करणाऱ्या ४५० पेक्षा अधिक स्थानिक भूमिपुत्र कंत्राटी कामगारांना बारा वर्षांपासून ओएनजीसी व्यवस्थापन, कामगार आयुक्त आणि कामगार संघटना यांच्यात सामंजस्य करार होऊनही अनेक मूलभूत हक्कापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या विरोधात ओएनजीसी प्रकल्पग्रस्त नागाव ,चाणजे व केगाव ग्रामपंचायती आक्रमक झाल्या असून प्रशासन व कंत्राटदाराविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिल्याची माहिती मंगळवारी उरणच्या शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यावेळी प्रकल्पात काम करणाऱ्या ४५० कामगारांच्या निवृत्तीनंतर त्याजागी यापुढे एकही कामगाराची भरती करण्यात येणार नाही, असा आदेशच ओएनजीसी प्रशासनाने काढला असल्याची माहिती त्यांनी दिली. स्थानिक कामगारांच्या हिताविरोधात काढण्यात आलेल्या आदेशामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी ओएनजीसी विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. हा आदेश मागे घेण्यात यावा आणि कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी २९ जुलै रोजी काळ्या फिती लावून आस्थापनाचा जाहीर निषेध करणार आहेत. तर यानंतरही ओएनजीसी प्रशासनाने दखल घेतली नाही तर ओएनजीसी स्थानीय प्रकल्पग्रस्त कामगार संघटनांच्या नेतृत्वाखाली आणि नागाव ,केगाव, चाणजे आदी ग्रामपंचायतींच्या पाठिंब्यावर आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे.

Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Lucknow NGO helps underprivileged children make Sabyasachi-inspired clothes; the designer reacts
झोपडपट्टीतील मुला-मुलींनी तयार केला सब्यसाची-प्रेरित ब्रायडल कलेक्शन! स्वत:च मॉडेलिंग करत केले हटके फोटोशूट, पाहा Video Viral
Viral video of a daughter dancing in the hospital where her mother is admitted craze for reel
अशी मुलगी नसलेलीच बरी! आई रुग्णालयात दाखल असताना पोटच्या पोरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
success story of Sindhu brothers who grows keshar with aeroponics method most expensive spice sells it for lakhs
भावांनी घरातच केली केशरची शेती, प्रगत तंत्रज्ञान वापरून मातीशिवाय हवेत वाढतात झाडे, वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
Who will understand the pain of parents
“आई वडिलांचे दु:ख कोण समजून घेणार” चिमुकल्याने सांगितले आई बाबांना वेळ देण्याचे दोन फायदे, VIDEO होतोय व्हायरल

हेही वाचा – दलालांमुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन; जनतेत योग्य संदेश जात नसल्याची गणेश नाईकांची टीका

उरण येथील ओएनजीसी प्रकल्पात विविध प्रकारच्या कंत्राटी कामात स्थानिक सुमारे ४५० कामगार काम करीत आहेत. ठेकेदार बदलला तरी तेच कामगार काम करतात. मात्र त्यांना कायमस्वरुपी कामगारांप्रमाणे वेतन, सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत नाहीत. यासाठी प्रकल्पातील मान्यताप्राप्त कामगार संघटनांकडून ओएनजीसी प्रशासनाविरोधात मागील अनेक वर्षांपासून जोरदार संघर्ष सुरू आहे.

कंत्राटी कामगारांचे अनेक प्रश्न जैसे थेच आहेत. दोन-तीन वर्षांत ठेकेदार बदलतात. मात्र अनेक ठेकेदार कामगारांची भविष्य निर्वाह निधी व देणी मुदतीत न देताच पलायन करतात. न्याय मिळत नसल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामध्ये ओएनजीसी प्रकल्पात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांच्या निवृत्तीनंतर त्याजागी यापुढे एकही कामगाराची भरती करण्यात येणार नाही असा आदेशच ओएनजीसी प्रशासनाने काढला असल्याने ओएनजीसी प्रशासन आणि कंत्राटी कामगार यांच्यातच संघर्षाची ठिणगी पडली आहे. या ठिणगीचे रुपांतर आंदोलनात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा – अमर रुग्णालयाची वैद्यकीय सेवा संशयाच्या भोवऱ्यात

यावेळी संघटनेचे अध्यक्ष अनंत घरत, प्रवीण पुरो, नागाव सरपंच चेतन गायकवाड, केगाव सरपंच जगजीवन नाईक, चाणजे सरपंच अजय म्हात्रे आणि ओएनजीसीचे कंत्राटी कामगार बहुसंख्येने उपस्थित होते.