उरण : तालुक्यातील पूर्व व पश्चिम या दोन विभागांना जोडणाऱ्या खोपटे पुलावर शनिवारी भलं मोठं भगदाड पडलं आहे. या भगदाडच्या शेजारी झुडूप लावून ठेवण्यात आले आहे. तर या भगदाडामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाल्याने समाजमाध्यमातून पुलावरून जाताना सावधानतेचा इशारा दिला जात आहे.
हेही वाचा – खबरदार! गोठ्यातील जनावर वर्दळीच्या रस्त्यावर सोडल्यास…
हेही वाचा – उत्तर गडचिरोलीवरील ‘हत्ती’ संकट गडद, हल्ल्यात शेती व घरांचे नुकसान; नागरिक दहशतीत
अवजड कंटेनर वाहतुकीमुळे पुलावर खड्डे पडल्याचे वृत्त बुधवारी लोकसत्तामध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावेळी प्रतिक्रिया देताना पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी खड्डे दुरुस्ती करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याच खड्ड्याच्या शेजारी पुलावर हे भगदाड पडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या या पुलावरील खड्ड्याकडे या विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे खड्ड्यांचे रुपांतर धोकादायक भगदाडात पडल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच या पुलावर विजेची व्यवस्था नसल्याने भगदाडामुळे अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. या पुलावरील खड्डे आणि भगदाडाची त्वरीत दुरुस्ती करण्याची मागणी प्रवासी व नागरिकांनी केली आहे.