पनवेल  शीव पनवेल महामार्गावरील कळंबोली वसाहतीच्या प्रवेशव्दारावर असणारा उड्डाणपुल दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आल्याने दुचाकीस्वार व रिक्षाचालकांनी कामोठेकडून बेकायदा प्रवास करण्याची सूरुवात केली आहे. वाहतूक पोलीस या मार्गिकेवर नेमले असले तरी पोलीसांची नजरचुकवून हा जिवघेणा प्रवास केला जात आहे. पुढील दिड महिन्यांच्या कालावधी शीव पनवेल महामार्गावरील कळंबोली वसाहतीच्या प्रवेशव्दारावरील उड्डाणपुल आणि भुयारी मार्ग वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सूमारे 500 मीटर अंतराचे कॉंक्रीटीकरण आणि खड्डे बुजविण्याचे कामाचा ठेका जे. एम. म्हात्रे. इन्फ्रा कंपनीला देण्यात आला आहे. भुयारी मार्गात वाहतूक बंद करण्यासाठी ठेकेदाराने भुयारी मार्ग दोन्ही बाजूकडून बंद केला आहे. तर शीव पनवेल मार्गिकेवरील उड्डाणपुल पुर्णता बंद आहे. मात्र काही वाहनचालक शॉर्टकटसाठी जिवघेणा प्रवास करत असून ते कामोठे वसाहतीकडून ते एमजीएम रुग्णालयापर्यंत पनवेल शीव महामार्गावरुन तीन आसनी रिक्षा व दुचाकीस्वार वाहने उलटदिशेने चालवित उलटचा प्रवास करीत आहेत. रात्रंदिवस हे काम सूरु ठेवणार असल्याचे पोलीसांनी सांगीतले आहे. वाहनचालकांना नियंत्रणासाठी ठेकेदाराने 10 कामगार नेमले आहेत तर वाहतूक पोलीस विभागाचे दोन कर्मचारी नेमल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक निशिकांत विश्वकार यांनी दिली.