भाजप, शिवसेना शिंदे गट पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात बंडखोरी

मला निवडणुकीची तयारी करा असा आदेश आला मात्र अचानक संदीप नाईक यांनी प्रवेश करताच मला बाजूला सारले असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते मंगेश आमले यांनी केला.

Shivena Shinde group, rebel in ncp Sharad Pawar,
भाजप, शिवसेना शिंदे गट पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात बंडखोरी (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

नवी मुंबई : तुम्ही घर पाडायचे ते आम्ही बांधायचे कौल चढवायचे आणि पुन्हा ते घर आदेश येताच तुमच्या ताब्यात द्यायचे हे आता चालणार नाही. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते मंगेश आमले यांनी खंत व्यक्त करत अपक्ष बेलापूर विधानसभा लढण्याचा निर्णय त्यांनी वाशीतील मेळाव्यात जाहीर केला. मला निवडणुकीची तयारी करा असा आदेश आला मात्र अचानक संदीप नाईक यांनी प्रवेश करताच मला बाजूला सारले असा दावाही त्यांनी केला

नवी मुंबईत गेल्या काही दिवसात सातत्याने धक्कादायक राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते मंगेश आमले यांनीही बंडाचे निशाण फडकावले आहे. आज वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडलेल्या मेळाव्यात त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. 

Ganesh Naik on Anand Dighe
Ganesh Naik: ‘माझे विरोधक स्वर्गवासी झाले, एकही जिवंत नाही’, भाजपा नेत्याच्या विधानानंतर शिंदे गट आक्रमक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Ramdas Athawale
Ramdas Athawale : “महायुतीने आमचा विचार केला नाही”, रामदास आठवलेंनी व्यक्त केली नाराजी; मुंबईतील ‘या’ जागेची मागणी!

हेही वाचा – तू मेलीस तर बरे होईल… पतीच्या टोमण्यांना वैतागूण महिला पोलीसाची आत्महत्या  

अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे काम करत आहे. २०१९ मध्ये एका कुटुंबाने दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी रिकामी झाली त्यावेळी आम्ही १० लोक शरद पवार यांना भेटून आम्ही पक्ष पुन्हा उभा करू असे पवारांना आश्वासीत केले. पक्षाच्या पडत्या काळात संघटन केले जागावले. २०१९ मध्ये कामाला लागा म्हणून सांगितले अचानक शांत बसण्यास सांगितले या वेळेससुद्धा निवडणूक कामाला लागा सांगण्यात आले, जोमाने कामाला लागलो, घरोघरी तुतारी पोहचवली. मागच्या आठवड्यापर्यंत घर बांधत आणले कौल टाकले निवडणुकीत पक्षातील कोणालाही तिकीट मिळाले असते तरी चालले असते जोमाने कामाला लागलो असतो. मात्र इथेही तेच झाले ज्यांनी पक्ष संपवला त्यांनाच संधी देण्यात आली. घर आम्ही बांधले आणि ताबा ज्यांनी पूर्वी घर पाडले त्यांच्या ताब्यात दिले. त्यामुळे अगतीत भावनेतून निर्णय स्वीकारला. असे आमले यांनी आपल्या भाषणात मन मोकळे केले आणि शेवटी निवडणूक अपक्ष लढण्याचा निर्णय जाहीर केला.  

हेही वाचा – नवी मुंबई: भीषण अपघात तीन ठार

नवी मुंबईत जुन्नर आंबेगाव पुणे परिसरातील लोक मोठ्या प्रमाणात राहण्यास आहे. त्यात आमले यांना मिळणारा प्रतिसाद पाहता या भागातील मते अपेक्षित असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार संदीप नाईक यांना धोक्याची घंटा आहे. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp followed by shivena shinde group now rebel in ncp sharad pawar group in navi mumbai ssb

First published on: 27-10-2024 at 20:39 IST

आजचा ई-पेपर : नवी मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या