नवी मुंबईतील सिवूड येथे गॉस्पेल चर्चच्यावतीने बेकायदेशीरपणे चालू असलेले बाल आश्रमात अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या ठिकाणची पाहाणी करून या अनधिकृत बाल आश्रमवर ८ दिवसांत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी वाशी येथे केली. भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.
हेही वाचा- खारघर वसाहतीच्या चतु:सीमेपर्यंत दारुबंदीचा निर्णय; पनवेल पालिका आयुक्तांचा मोठा निर्णय
या वेळी चित्रा वाघ म्हणाल्या की, सिवूड बेथेल गॉस्पेल चर्चच्या बाल आश्रममध्ये चार अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. या बाल आश्रममध्ये एक काचेची पेटी आहे. तेथे मुलांचे मुलींची धर्मांतरण केले जाते का? अद्याप तेथे एक मुलगा व २ मुली आहेत. अजून कोणाच्या आशीर्वादाने हा बाल आश्रम चालू आहे? असा सवाल वाघ यांनी केला. या प्रकरणी महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर तसेच पोलीस आयुक्त यांची भेट त्यांनी घेतली. बाल आश्रमच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई न झाल्याने अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांची विभागीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून कोणताही थारा मिळणार नाही या बांधकामांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
हेही वाचा- उरण: जासई उड्डाणपुलाचे आठ वर्षांपासून रखडलेले काम पूर्ण होण्यास २०२३ उजाडणार
नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी एका अनाथ आश्रममध्ये अशीच घटना घडली होती तेथील आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अशा सर्व अनाथ आश्रमची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. अशी माहितीही वाघ यांनी दिली.