नवी मुंबईत वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी सिडकोकडून भूखंड प्राप्त झाला आहे. सहज शक्य असूनही त्याची रक्कम अदा करून भूखंड घेतला जात नसल्याने अखेर भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिकेला आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या १५ दिवसात मनपाने रक्कम सिडकोला देत भूखंड व्यवहार पूर्ण करावा अन्यथा २५ तारखेला आंदोलन करण्यात येईल, असे पत्र थेट मनपा आयुक्तांना दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामन्यादरम्यान सट्टेबाजांचा सुळसुळाट; चार जणांना अटक
 
नवी मुंबई हे पुण्यानंतर शिक्षण पंढरी बनण्याकडे वाटचाल करीत असताना सरकारी वैद्यकीय महाविद्यालाची नितांत गरज होती. करोना काळात याची जाणीव सर्वच पातळीवर झाली. त्यामुळे यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आणि मनपा मुख्यालय  नजीक ३४ हजार ८०० चौरस मीटरचा  भूखंड  या साठी अग्रेषित करण्यात आला. त्यासाठी  एकशे सात कोटी तेरा लाख ५२ हजार ८०० रुपये मनपा सिडकोला देणे अपेक्षित होते. दरम्यान हि रक्कम कमी करावी म्हणून प्रयत्न केल्यावर सुमारे ६० कोटी रुपये कमी करण्यात आले असा दावा त्यावेळी आमदार म्हात्रे यांनी केला. मात्र तरीही भूखंड खरेदीत चालढकल केली जात असून स्थानिक राजकारणात मैलाचा दगड ठरणारा प्रकल्प अडकला जाऊ नये यासाठी नियमाप्रमाणे मनपाने  सहकार्य करावे. असे आवाहन आमदार म्हात्रे यांनी केले आहे. सदर भूखंड पोटी असलेली रक्कम १५ दिवसात मनपाने सिडकोला द्यावी अन्यथा २५ तारखेला उग्र आंदोलन करण्यात येईल असे पत्रच आयुक्त राजेश नार्वेकर यांना दिले आहे. अशी माहिती म्हात्रे यांनी दिली.

हेही वाचा- मोबदल्यासाठी साठ वर्षांपासून प्रतीक्षाच; सिडको- रेल्वे प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू
 
वेतन वाढवण्याची गरज

विद्यमान स्थितीत नवी मुंबईत तीन रुग्णालय इमारती आहेत. मात्र त्यात काम करणारे डॉक्टरांना वेतन कमी असल्याने काम करण्यास फारसे उत्सुक नसतात. तसेच सदर रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याच्या अनेक तक्रारी होत समोर येत आहेत. रुग्णालयात एमम.आर. आय. सुविधा उपलब्ध नसून नेरुळ आणि ऐरोली रुग्णालयात अतिदक्षता विभाग नाही डॉक्टर्स आणि नर्सची कमतरता तसेच औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यास आरोग्य विभाग कमी पडत आहे. याकरिता डॉक्टर आणि नर्सची नव्याने भरती करण्याची गरज म्हात्रे यांनी आयुक्तांना दिलेल्या अन्य एका पत्रात व्यक्त केली आहे.