करोनानंतर निर्बंधमुक्त वातावरणात सर्वत्र दिवाळीच्या सणाचा आनंद पाहायला मिळत असताना दुसरीकडे नवी मुंबईत मात्र ऐन दिवाळीतच राजकीय शिमगा सुरु झाला आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे व ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांचे सुरवातीपासूनच विळ्या भोपळ्याचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. गणेश नाईक यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर नवी मुंबईतील दोन्ही मतदारसंघात भाजपाचेच आमदार असून यांच्यातील राजकीय वैर मात्र संपता संपत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ऐन दिवाळीत सिबीडी येथे होऊ घातलेल्या शासकीय हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या प्रकल्पावरुन आता ऐन दिवाळीत राजकीय शिमगा सुरु झाल्याचे चित्र आहे. आमदार मंदा म्हात्रे यांनी सामान्य जनतेसाठी असलेल्या शासकीय हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या कामात अडथळा आणण्याचा व आडवा पाय घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सोडणार नाही. रंगरंगोटी केलेला चेहऱ्यावरील फसवा बुरखा फाडून सर्व धंदे रस्त्यावर आणण्याचा इशारा मंदा म्हात्रे यांनी दिला आहे.
हेही वाचा- उरण: रेल्वे रुळावरून वाहन चालकांचा धोकादायक प्रवास
सिबीडी सेक्टर-१५ए येथे शासकीय हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या भूखंडाचा सिडकोने नवी मुंबई महानगरपालिकेला लावलेला १०७ कोटींचा दर हा ५० टक्के ने कमी करण्यात यावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले त्यात यश आले त्यानंतर १० कोटी जीएसटी माफ करण्यात यश आले. त्यामुळे जवळजवळ १०७ कोटीचा भूखंड हा फक्त ४९ कोटीला पालिकेला मिळाला असून याकरिता सिडको व पालिकेचे अधिकारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगल्या कामाला पाठबळ दिल्याने सीबीडी नवी मुंबई येथे शासकीय हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज उभारण्याबाबतचा मार्ग मोकळा झाला आहे. २५ वर्षात जे झाले नाही ते नवी मुंबईकरांना प्रतीक्षा असलेला निर्णय झाल्याने आता अनेकांच्या पोटात दुखत आहे.नवी मुंबई क्षेत्रात शासकीय मेडिकल पदवी कॉलेज उभारल्याने स्थानिक विद्यार्थ्याना त्याचा लाभ होणार आहे. सामान्य व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी हे पात्रता असूनही आर्थिक परिस्थितीमुळे वैद्यकीय शिक्षणापासून वंचित राहत असल्याने त्याचाही फायदा विद्यार्थ्यांना उच्च वैद्यकीय शिक्षण मिळण्याकरिता होणार आहे.
हेही वाचा- प्रदर्शन विक्री केंद्राच्या माध्यमातून महापालिकेचे महिलांना आर्थिक पाठबळ
करोनाकाळात ठाणे, कल्याण, उरण, पनवेल, कर्जत, खोपोली तालुक्यातील रुग्णही उपचाराकरिता नवी मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल होत असल्याने नवी मुंबईतील स्थानिक रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने उपचाराविना मृत्यू होण्याची संख्याही वाढली होती.. नवी मुंबईसारख्या विकसित शहरात शासकीय सुपरस्पेशालीस्ट हॉस्पिटल उभारणे काळाची गरज आहे. नवी मुंबई क्षेत्रात एकही शासकीय मेडिकल पदवी कॉलेज नसल्याने स्थानिक विद्याथ्यांना खाजगी कॉलेज किंवा नवी मुंबई बाहेरील कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणाकरिता जावे लागत आहे.परंतू होऊ घातलेल्या चांगल्या कामााला विरोध केला जात असला तरी आपण कोणालाही घाबरत नसून लोकांसाठी असलेला हा प्रकल्प असून त्याला विरोध करणाऱ्याना आपल्याशी गाठ असल्याचा इशारा दिला आहे.मरीनासह अनेक कामांमध्ये यांनी विरोध केला असून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजला विरोध करणाऱ्यांनी नवीन पालिका आयुक्त यांना चुकीची माहिती देत हा प्रकल्प रखडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपाचेच आमदार गणेश नाईक यांच्यावर अप्रत्यक्षपणे केला आहे. त्यामुळे नवी मुंबईत भाजपच्याच दोन आमदारांमध्ये अंतर्गत वादाला सुरवात होणार आहे.
हेही वाचा- कमी बोनस मिळाल्यामुळे कामगारांचे आंदोलन, नवी मुंबईतील शवविच्छेदन केंद्र बंद
आगामी काळात पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु होणार असून नवी मुंबईतील राजकारणात शिवसेना व शिंदे गट यांच्यात वादंग सुरु असून भाजपमधील दोन्ही आमदारांचे विळ्या भोपळ्याचे नाते संपता संपत नाही.तर राष्ट्रवादी व कॉंग्रेसमध्ये असलेली दयनीय अवस्था यामुळे पालिका निवडणुकांच्यापूर्वीच भाजपच्या दोन आमदारांमध्ये सुरु झालेला कोल्डवॉर कोणते रुप घेणार हे पुढील काळातच स्पष्ट होणार आहे. आमदार गणेश नाईक हे सातत्याने प्रशासक कार्यकाळ लागल्यापासून पालिका आयुक्तांची आठवड्यातून एक दिवस शहरातील विविध प्रश्नांबाबत भेट घेतात.नव्या पालिका आयुक्तांना मेडिकल कॉलेज व शासकीय हॉस्पिटलच्याबाबत चुकीची माहिती देत फंड कोठून उभारणार, त्या ठिकाणी खेळाचे मैदानच ठेवावे अशी माहिती दिल्याच्या प्रकारावरुन वादंगाला सुरुवात झाली आहे. याबाबत नाईक यांच्या गटाकडून प्रतिक्रिया घेतली असता आमदार म्हात्रे काय म्हणाल्या ते आम्ही ऐकले नाही . निंदकाचे घर असावे शेजारी, अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
हेही वाचा- नवी मुंबई: नवनिर्वाचित आयुक्तांची अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट
माझ्या चांगल्या कामात अडथळा आणला तर…
आतापर्यंत माझ्या हिमतीने शहरात अनेक चांगले कामे केली आहेत.त्यामुळेच जनतेने मला सलग दोन वेळा निवडून दिले आहे. ज्यांना २५ वर्षात जे जमले नाही ते मी करुन दाखवले तर यांच्या पोटात दुखू लागले आहे. १०७ कोटीचा भूखंड फक्त ४९ कोटीत मिळवला आहे.आधी मोफत मिळवा असा ओरडा केला आता फक्त ४९ कोटीत आडे आठ एकरचा भूखंड तोसुध्दा वैद्यकीय सुविधेसाठी तर आयुक्तांना सांगून तेथे खेळाचे मैदानच असू द्या असे सांगीतले जाते. ज्यांनी मला पाण्यात बघीतले ते अर्धे पाण्यात बुडाले .आता पूर्ण पाण्यात बुडायचे नसले तर माझ्या नादाला लागू नका तुमची सगळी नौटंकी जनतेसमोर आणेन, असा इशारा मत बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी अप्रत्यक्षपणे गणेश नाईक यांना दिला आहे.