करोनानंतर निर्बंधमुक्त वातावरणात सर्वत्र दिवाळीच्या सणाचा आनंद पाहायला मिळत असताना दुसरीकडे नवी मुंबईत मात्र ऐन दिवाळीतच राजकीय शिमगा सुरु झाला आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे व ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांचे सुरवातीपासूनच विळ्या भोपळ्याचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. गणेश नाईक यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर नवी मुंबईतील दोन्ही मतदारसंघात भाजपाचेच आमदार असून यांच्यातील राजकीय वैर मात्र संपता संपत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ऐन दिवाळीत सिबीडी येथे होऊ घातलेल्या शासकीय हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या प्रकल्पावरुन आता ऐन दिवाळीत राजकीय शिमगा सुरु झाल्याचे चित्र आहे. आमदार मंदा म्हात्रे यांनी सामान्य जनतेसाठी असलेल्या शासकीय हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या कामात अडथळा आणण्याचा व आडवा पाय घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सोडणार नाही. रंगरंगोटी केलेला चेहऱ्यावरील फसवा बुरखा फाडून सर्व धंदे रस्त्यावर आणण्याचा इशारा मंदा म्हात्रे यांनी दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा