नवी मुंबई : रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणावर नागरिक मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे दरवर्षी शहरात ब्लॅक स्पॉट (अपघात प्रवण क्षेत्र) निश्चित करून त्याठिकाणी विविध उपाययोजनेच्या माध्यमातुन वाहन अपघात कमी करण्यासाठी नियोजन आखले जाते. शीव-पनवेल आणि ठाणे-बेलापूर महामार्ग हे शहरातील मुख्य महामार्ग असून याठिकाणी नेहेमीच वाहनांची वर्दळ असते. मागील वर्षी शीव-पनवेल, ठाणे- बेलापूर महामार्गवर ७ ब्लॅक स्पॉट होते मात्र यंदा ते कमी झाले असून ५ ब्लॅक स्पॉट आहेत, अशी माहिती तुर्भे विभागाचे वाहतूक निरीक्षक नितीन गीते यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 अपघात प्रवण क्षेत्र हे तीन वर्षांत ज्या रस्त्यावर ५ पेक्षा अधिक अपघात आणि १० वाहन चालक अपघातात मृत्यू पावले असतील तर त्याला ब्लॅक स्पॉट जाहीर केले जाते. शीव- पनवेल आणि ठाणे-बेलापूर महामार्ग हे मुख्य महामार्ग असून नेहमीच वाहनांची वर्दळ असते. शीव- पनवेल आणि ठाणे-बेलापूर महामार्ग त्याच बरोबर आरटीओने शीव- पनवेल महामार्ग, उरण फाटा ब्रिज, नेरुळ एल पी ब्रिज, जुईनगर रेल्वे स्थानक, बस स्थानक, शरयू शो रूम, दत्त मंदीर, तुर्भे ब्रिज, सानपाडा जंक्शन, वाशी गाव सिग्नल दोन्ही बाजू या ठिकाणांना अपघात प्रवण क्षेत्र जाहीर केले आहे.

याठिकाणचे ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग,  नवी मुंबई महापालिका, वाहतूक विभाग आणि आरटीओकडून विविध उपाययोजना करून अपघात कमी करण्यावर भर दिला जातो. या ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी  झेब्रा क्रॉसिंग, स्टॉप लाईन, थर्मोप्लास्ट पेंट, कॅटाईज ब्लिंकर्स, रम्बलर तात्पुरत्या उपयोजना करण्यात आल्या असून कायम स्वरूपी उपयोजना करण्यासाठी शासनाला पत्र पाठविण्यात आले आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली आहे.