नवी मुंबईतील वाशी ते सीबीडी दरम्यानच्या पाम बीच या मार्गावर सव्वा नऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. मात्र सुदैवाने यात जीवितहानी झाली, नसून अपघातास कारणीभूत बी एम डब्ल्यू गाडी चालक पळून गेला आहे.
नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर अक्षर चौकात ही घटना घडली सी उड नोंड मध्ये एका उच्चभ्रू इमारतीत राहणारा युवक रात्री ९ च्या सुमारास बी एम डब्ल्यू गाडी घेऊन बाहेर पडला. प्रत्यक्ष दर्शीने दिलेल्या माहितीनुसार हा व्यक्ती मद्याच्या अमलाखाली होता, त्यामुळे सुरक्षा रक्षकानेही अशा अवस्थेत गाडी घेऊन जाऊ नका असे सांगितले मात्र त्या व्यक्तीने त्याला धुडकावून आपली गाडी घेऊन बाहेर पडला सुसाट गाडी चालवत राहत्या सोसायटी मधून बाहेर पडल्यावर वाशी दिशेने जात असताना अति वेगावर नियंत्रण न राहिल्याने त्याची गाडी थेट सिग्नलच्या खांब्यावर जाऊ धडकली गाडीचा वेग एवढा होता की सिग्नलचा खांबा आणि त्या खालील चौथरा जवळपास तुटला आहे. अपघात घडल्यावर वाहन चालक पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत अशी महिती एनआरआय पोलिसांनी दिली