उरण : उरण – पनवेल मार्गावरील नादुरुस्त मोऱ्यांच्या दुरुस्तीसाठी शनिवार पासून बोकडवीरा पोलीस चौकी ते उरण रेल्वे स्टेशन मार्ग अखेर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे उरण शहरातून व शहरा बाहेरून ये जा करण्यासाठी प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने  केली आहे.

उरण – पनवेल मार्गावरील बोकडवीरा पोलीस चौकी ते कोटनाका(आनंदी हॉटेल)दरम्यानच्या दोन मोऱ्या नादुरुस्त झाल्या आहेत. त्यांची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम काम विभागा कडून करण्यात येणार आहे. मात्र मोऱ्यांच्या दुरुस्ती साठी मार्ग बंदी आणि पर्यायी मार्गाची अधिसूचना नवी मुंबई वाहतूक विभागाकडून प्रलंबित होती. त्यामुळे मार्च महिन्या पासून या कामाची प्रतिक्षा होती. ही अधिसूचना वाहतूक विभागाने जाहीर केली असल्याने या कामाला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा >>> Karnataka Election Results 2023 : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस विजयी, कार्यकर्त्यांचा नवी मुंबईत जल्लोश

सध्या उरण रेल्वे स्टेशन जवळील मोरी तोडून त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या मार्ग मोऱ्याचे काम पूर्ण होई पर्यंत बंद राहणार आहे. पर्यायी मार्ग : उरण – पनवेल मार्गावरील बोकडवीरा पोलीस चौकी ते उरण रेल्वे स्टेशन हा मार्ग बंद केला आहे. त्यामुळे उरण शहरात ये जा करणाऱ्या प्रवाशांनी बोकडवीरा येथून उड्डाणपूल मार्गे शेवा ते चारफाटा प्रवास करावा लागणार आहे. मात्र सध्या उरण कोटनाका ते जुना रेल्वे रस्ता मार्गाने नवी मुंबई एस ई झेड कंपाऊंड मार्गाने बोकडवीरा पेट्रोल पंप या मार्गाने रिक्षा सुरू आहेत.

Story img Loader