नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड दोन आठवड्यात घ्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने दिले आहेत. सन २०२२ मध्ये सभापती, उपसभापती यांनी आपत्र ठरल्याने राजीनामा दिला होता, त्यामुळे ही पदे गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असून तोपर्यंत सभापती अशोक डक काळजीवाहू सभापती म्हणून कार्यभार पाहत आहेत. ऑगस्टमध्ये या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात येत असून पुन्हा नव्याने निवडणुका होतील. त्यामुळे औक घटकेसाठी या सभापतींची निवडणूक होणार की शासन संचालक मंडळ बरखास्त करणार अशी चर्चा बाजारात सुरु आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकुण २७ संचालक असतात. सहा महसूल विभागांतील प्रत्येकी दोन शेतकरी प्रतिनिधी, वाशीतील कांदा बटाटा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाजार, भाजीपाला,फळ, धान्य आणि मसाला बाजारातून प्रत्येकी एक असे पाच संचालक तर माथाडी, हमाल, कामगारांमधून एक संचालक निवडला जातो. अशी १८ जणांची निवडणूक होते. राज्यातील ३०६ बाजार समित्यांची शिखर संस्था असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक फेब्रुवारी २०२० मध्ये बाजार समितीची निवडणूक घेण्यात आली होती. तर २ मार्च २०२० रोजी निकाल लागला होता. याआधी एपीएमसी बाजार समितीवर २०१३ ते २०२० असे सलग सात वर्ष प्रशासक राजवट होती. मात्र निकाल लागताच देशात करोना संक्रमण आले आणि टाळेबंदी जाहीर झाली. त्यामुळे संचालक मंडळाच्या बैठकी अभावी सभापतींची नियुक्ती लांबवणीर गेली.

३१ ऑगस्ट २०२० संचालक मंडळाच्या बैठकीत बीडचे शेतकरी प्रतिनिधी अशोक डक यांची सभापतीपदी निवड करण्यात आली. त्यामुळे निकाल मार्च २०२० मध्ये लागला तरी संचालक मंडळांचा कार्यकाळ हा ऑगस्ट २०२० पासून ग्राह्य धरण्यात आलेला आहे. मात्र आता उच्च न्यायालयाने येत्या काही आठवड्यांमध्ये सभापती, उपसभापतीची निवडणूक घेण्या आदेश दिले आहेत.

सभापती आणि उपसभापती निवडणुकीबाबत न्यायालयाचे आदेश असल्याचे समजले आहे. त्याची लेखी प्रत आमच्याकडे अद्याप प्राप्त झालेले नाही. प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येईल. डॉ. पी. एल. खंडागळे, सचिव, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती