लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : फ्लेमिंगो पक्ष्यांचा प्रमुख अधिवास असलेल्या नवी मुंबईतील डीपीएस तलावाला पुन्हा पाणथळीचे रूप येत आहे. असे आशादायी चित्र असताना या तलावानजीक असलेल्या टी एस चाणक्य तलावापासून काही अंतरावर गेले काही दिवस तरुणांच्या मद्या मेजवान्या झडत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. काही तरुण दुचाकीवरून या भागात येत असून येथील बामणदेव मंदिरामागील जागेत बसून मद्या सेवन करीत असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत. याची गंभीर दखल घेत पोलिसांनी बीट मार्शल गस्त वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

USS Edsall, World War II
Dancing Mouse: ८१ वर्षांनंतर सापडले ‘डान्सिंग माऊस’ या दुसऱ्या महायुद्धातील युद्धनौकेचे अवशेष; इतिहास नेमकं काय सांगतो?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
History Of Tipu Sultan
एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यंगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?
youth stabbed in head, Thane, Thane crime news,
ठाणे : वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात चाकूने भोसकले
midc conversion land in thane belapur belt for residential complexes
नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यातीलही भूखंड खासगी विकासकाकडे!
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?

पामबीच मार्गावरील टी. एस चाणक्य सिग्नलवरून फ्लेमिंगो तलावाकडे येणाऱ्यांची संख्या खूप मोठी असून दुसरीकडे पामबीच मार्गावरून बामणदेव परिसरात व टी एस चाणक्य परिसरात दुचाकी घेऊन जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. मूळातच या भागात वाहने नेण्यास परवानगी नाही. परंतू दुचाकीवरुन मुलामुलींचे जत्थे या परिसरात जातात. तसेच रात्रीच्या अंधारात या परिसरात मद्याच्या पार्ट्या झडत असल्याचे पाहायला मिळते.

आणखी वाचा-पनवेल : कामोठ्यात सहा लाखांची घरफोडी

शहरात फ्लेमिंगोंचे अधिवास क्षेत्र असून याकडे सिडको जाणीपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. तर महापालिकेनेही आपल्या विकास आराखड्यात फ्लेमिंगो अधिवासाला फाटा दिला आहे. परंतू शहरातील फ्लेमिंगो अधिवास असलेल्या टी. एस. चाणक्य तलाव व नेरुळ एनआरआय तलाव येथे लाखो फ्लेमिंगोंचे आगमन होत आहे. डीपीएस तलाव येथील खाडीतून तलावात पाणी येण्याचा मार्गच बंद झाल्याने या ठिकाणी यंदाच्या हंगामात फ्लेमिंगोचे दर्शन झाले नव्हते. परंतु नुकतेच या ठिकाणी खाडीचे पाणी येण्याचा मार्ग खुला केल्याने नेरुळ डीपीएस तलावातही फ्लेमिंगो पाहायला मिळाले. फ्लेमिंगोंना भरपूर खाद्या मिळत असल्याने नवी मुंबईतील पाणथळ जागेत त्यांचा वावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो.

टी. एस. चाणक्य परिसरात चारचाकी वाहनांची सातत्याने वर्दळ पाहायला मिळत असून छुप्या पध्दतीने अंधाराचा फायदा घेत फ्लेमिंगो अधिवासात होणाऱ्या पार्ट्यांवर पोलिसांनी नजर ठेवण्याची आवश्यकता आहे. या परिसरात साफसफाई करताना मोठ्या प्रमाणात दारुच्या बाटल्या प्लास्टिकच्या बाटल्या सापडतात. पाण्यातही दारुच्या बाटल्या सापडत असून पालिकेने या परिसरात निर्माल्य कलश ठेवला आहे. परंतु दारु पिणे व बाटल्या फेकून येथील सौंदर्याला व सुरक्षिततेला बाधा पोहचवण्याचे काम करु नये, सेव्ह मॅँग्रोजचे धर्मेश बराई सांगितले.

आणखी वाचा-पनवेल आगारात एसटीत चढताना सोनसाखळी चोरी

फ्लेमिंगोंच्या परिसरात दुचाकी घेऊन जाण्यास निर्बंध असताना दुचाकीवरुन मोठ्या प्रमाणात तरुणाई बामणदेव मंदिराच्या पाठीमागे जाते. त्यामुळे अनुचित प्रकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी व पालिकेने पामबीच मार्गावरुन बामणदेव भागात जाणारा बेकायदा मार्ग बंद केला पाहिजे. पालिकेने लावलेले बॅरिकेड्स तोडण्यात आले आहेत. -सुनील अग्रवाल, पर्यावरणप्रेमी

युवकांचे दारु पिणे तसेच चुकीच्या मार्गाने बामणदेव मंदिर परिसरात उशीरापर्यंत जाणे व दारु पिणे असे प्रकार चालत असतील याबाबत पाहणी करण्यात येईल. या परिसरात बीट मार्शल यांची गस्त वाढवण्यात येईल. -गिरीधर गोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक