नवी मुंबई : वाशी सेक्टर १५ येथील मनपाच्या उद्यानातील पाण्याच्या टाकीत पडून एका आठ वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत झाला आहे. या प्रकरणी अद्याप कोणावर गुन्हा दाखल झाला नसून पोलीस दफ्तरी घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शनिवारी दिवाळीचा पाडवा असल्याने लहान मुलांनी उद्याने फुलून गेली होती. वाशी सेक्टर१४ येथील पालवे उद्यानातही चिमुकल्यांची गर्दी होती. मात्र रात्री नऊ साडे नऊच्या सुमारास या गर्दीतील एक आठ वर्षीय मुलगा अचानक दिसेनासा झाला. त्याचा खूप शोध घेतला मात्र तो आढळून आला नाही. काही वेळाने शंका आल्याने उद्यानातील भूमिगत पाण्याच्या टाकीचे झाकण उघडे असल्याचे लक्षात आल्याने टाकीत पाहणी केली असता मुलगा आढळून आला. त्याला बाहेर काढून नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्या पोटात गेलेले पाणी काढण्यात आले,  मात्र तेथे अतिदक्षता विभाग नसल्याने त्याला मनपा रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अशी माहिती स्थानिक माजी नगरसेवक प्रकाश मोरे यांनी दिली. सदर माहितीला दुजोरा वाशी पोलिसांनी दिला आहे. या घटनेची नोंद अद्याप न झाल्याने नाव माहिती नाही असेही वाशी पोलिसांनी सांगितले.