पाच वर्षापासून प्रेमसमंध असणाऱ्या प्रेयसीला प्रियकराचे अन्य महिलेशी सुत जुळल्याचे कळल्यावर तिने ब्रेकअप केले. मात्र तरीही त्या प्रियकराने तिला फोटो व्हायरल करेल, आत्महत्या करेल अशा धमक्या देऊन घरी बोलावले. घरी गेल्यावर त्याने आणि त्याच्या नवीन प्रेयसीने तिला बेदम मारहाण केली. स्वतःची कशी बशी सुटका करून “त्या” दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हि घटना नवी मुंबईतील असून लोकेश तायडे असे यातील आरोपीचे नाव असून दुसऱ्या महिला आरोपीचे नाव अद्याप समोर आलेले नाही.
हेही वाचा >>> नवी मुंबई : चेहरा धुताना अंगावर पाणी उडाल्याने व्यक्तीवर कटरने वार
लोकेशचे एका युवती समवेत पाच वर्षापासून प्रेमसमंध होते. तरीही त्याचे अन्य एका युवतीशी सुत जुळले. हि बाब पिडीत युवतीला कळल्यावर तिने लोकेश याच्याशी वाद झाल्या नंतर संवाद बंद केला.७ तारखेला लोकेश यांनी पिडीत युवतीला फोन केला व घरी येण्यास सांगितले मात्र तिने नकार दिल्याने त्याने जुने फोटो व्हायरल करेल आत्महत्या करेल अशी धमकी दिल्याने पीडिता लोकेश याच्या घरी गेली. मात्र दरवाजा लोकेश याने न उघडता त्याच्या नव्या प्रेयसीने उघडला. तिने एक वर्षापासून लोकेशची गर्लफ्रेंड असल्याचे सांगत लोकेश याचा नाद सोड म्हणून बेदम मारहाण सुरु केली. तिला साथ देत लोकेश यानेही काठीने पिडीतेस डोके, पाठ, मांडी, हातावर असे घाव घातले. तसेच जीवाचे बरेवाईट करेल अशी धमकीही दिली. शेवटी पिडीतेने स्वतःची कशी बशी सुटका करून घेत आपल्या काकाच्या मदतीने पोलीस ठाण्यात जाऊन लोकेश आणि त्या अनोळखी युवतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.