को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे नाव सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी लाच मागणारा तलाठी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. हि घटना पनवेल येथील सुकापूर येथे घडली असून सदर कारवाई नवी मुंबई लाच लुचपत विभागाने केली आहे.
हेही वाचा >>>नवी मुंबई पनवेल परिसरात महावितरणचे १२ इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन कार्यान्वित
संजय विष्णू पाटील असे लाच स्विकारलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा पनवेल तालुक्यातील सुकापूर सिल्लोत्तर येथे तलाठी म्हणून कार्यरत आहे. यातील तक्रारदार यांचे राहते मातोश्री को-ऑपरेटिव्ह या सोसायटीचे नाव सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तलाठी संजय पाटील यांनी २५ डिसेंबरला वीस हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र तडजोड करीत हा सौदा दहा हजार रुपयात ठरला होता. या बाबत तक्रारदार यांनी हि माहिती लाच लुचपत विभागाला दिली. लाच लुचपत विभागाने तक्रारीची खात्री करून शुक्रवारी सापळा रचला होता.
हेही वाचा >>>सीसीटीव्ही यंत्रणेव्दारे नवी मुंबई महानगरपालिकेच्या ५५ शाळा इमारतींच्या सुरक्षेचे सक्षमीकरण
यावेळी या सापळ्यात आरोपी संजय हा अडकला . या पथकात पोलीस निरीक्षक .विद्युलता चव्हाण, पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे, पोलीस हवालदार जाधव, पवार, महिला पोलीस नाईक बासरे,पोलीस शिपाई चव्हाण, माने, चौलकर यांचा समावेश होता. तर सदर कारवाई उप अधीक्षक ज्योती देशमुख यांच्या मार्गदर्शखाली पार पडली