नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेसाठी बीआरएस ने फुंकले रणशिंग, फुंकले असून गणेश नाईकांना थेट आव्हान दिले आहे. बी आर एस चा मेळावा वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडला. मेळाव्यात सर्व निवडणुकीत आमचा पक्ष उतरणार असल्याचे सांगण्यात आले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

 नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहात के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस (भारत राष्ट्र समिती) पक्षाचा जाहीर मेळावा आज पार पडला. यावेळी तेलंगणात सर्वांना सोबत घेत विकास होत आहे तसाच महाराष्ट्रात करण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मेळावा नवी मुंबईत असल्याने स्थानिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी आमदार गणेश नाईक यांना आव्हान देत आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी या मेळाव्याच्या माध्यमातून रणशिंग फुंकण्यात आले.

आणखी वाचा-उरण – मुंबई जलसेवा पूर्ववत, चक्रीवादळामुळे ९ जूनपासून होती बंद

तेलंगनाचे बीआरएस पक्षाचे आमदार राजेंदर रेड्डी आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला. यावेळी आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुक बीआरएस पक्ष मोठ्या ताकदीने लढणार असून नागरिकांना एक सक्षम राजकीय पर्याय देण्याचा प्रयत्न बीआरएस करणार असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार हरिभाऊ राठीड यांनी व्यक्त केली.