लोकसत्ता टीम
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
उरण : शहरात राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीची उरणमध्ये अतिशय क्रूर हत्या करण्यात आली आहे. या तरुणीचे अवयव कापण्यात आल्याचे, चेहरा तसेच गुप्तांगावर जखमा असल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे उरण तालुका हादरला आहे. त्याचा सर्वत्र जाहीर निषेध केला जात आहे.
नागरिकांनी उरणच्या इंदिरा गांधी रुग्णालयात धाव घेत आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. घटनेनंतर उरणचे आमदार महेश बालदी यांनी पोलिसांना तातडीने आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे. तर पोलीस तपास सुरू असून लवकरच आरोपी ताब्यात घेतला जाईल, अशी माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते पाटील यांनी दिली आहे.
First published on: 27-07-2024 at 12:03 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brutal killing of young woman in uran citizens angry mrj