या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाशीतील एमजीएम रुग्णालयात दाखल; प्रकृती चिंताजनक

काही महिन्यांपूर्वी ठाण्यात बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी आत्महत्या केली असताना नवी मुंबईत स्वराज बिल्डर्सचे प्रमुख राज खंदारी यांनी सोमवारी पामबीच येथील राहत्या घरी स्वत:च्या रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात राज हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना वाशीतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

राज खंदारी हे सानपाडा येथील पामबीचलगत असलेल्या राज उदय इमारतीत ११ व्या मजल्यावर कुटुंबासह राहतात.  सोमवारी दुपारी घरामध्ये आई, बहीण व दोन मोलकरणी असताना राज यांनी बेडरूममध्ये स्वत:च्या रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. खंदारी यांना एमजीएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. या घटनेमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी?

स्वराज बिल्डर्सचा  घणसोलीमध्ये एक प्रकल्प सुरु होणार होता. त्याचा प्रस्ताव पालिकेच्या नियोजन विभागाकडे अनेक दिवसांपासून पडून होता. आत्महत्याचा प्रयत्न करणारे खंदारी यांनी एक पत्र लिहून ठेवले आहे. त्यामध्ये पालिकेच्या नियोजन विभागाने त्यांच्या घणसोली येथील प्रकल्पाला लावल्याच्या विलबांची नोंद असून पोलीस नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करणार आहे.