Building Collapse in Navi Mumbai : नवी मुंबई शहरातील बेलापूर विभागात शहाबाज गावात आज पहाटे ५ वाजताच्या दरम्यान इंदिरा निवास ही बेकायदा अनधिकृत इमारत कोसळली आहे. सदर दुर्घटनेत ५२ जण सुखरूप बाहेर पडले असून अद्याप इमारतीत दोन जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. परंतु, इमारतीजवळ उभ्या असलेल्या दुचाकींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. (Building Collapse in Navi Mumbai)

Arrest for vandalizing vehicles in Kasba Peth pune news
कसबा पेठेत वाहनांची तोडफोड करणारे गजाआड; दोन अल्पवयीन ताब्यात
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
in pune one killed and one injured in rickshaw-dumper collision
पुणे : रिक्षा-डंपरच्या धडकेत एक ठार, एक जखमी
pune police
पुण्यात दहशत माजवणाऱ्यांना पुणे पोलिसांनी दाखवला इंगा! गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांची रस्त्यावरून काढली धिंड, Video Viral
Bmc to buy dust control equipment
धुळीची समस्या नियंत्रणात आणण्यासाठी पालिका अद्ययावत यंत्रे खरेदी करणार
Mumbai Chembur Metro accident
मुंबई : चेंबूरमध्ये मेट्रोचं अर्थवट बांधकाम रहिवासी सोसायटीच्या आवारात कोसळलं
Three people have been arrested in connection with drug smuggling and production.
सांगलीत मेफेड्रोन उत्पादन करणारा कारखाना उद्ध्वस्त, ३० कोटींचा साठा जप्त, तिघांना अटक
Buldhana, Speeding car hits a vehicle, car ,
बुलढाणा : भरधाव कार वाहनावर आदळली, एक जागीच ठार, दोघे गंभीर…

नवी मुंबई महापालिका व एनडीआरएफच्या मदतीने रात्री पाच वाजल्यापासूनच या ठिकाणी पडलेल्या इमारतीचा मलबाबाहेर काढण्याचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी दिली. इमारत कोसळण्यापूर्वी इमारतीला हादरे बसत असल्याने घाबरलेले नागरिक इमारती बाहेर पडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. दुर्घटनेत बाहेर काढण्यात आलेल्या सर्व जणांना नवी मुंबई महापालिकेच्या बेलापूर विभागातील रात्र निवारा शिबिरात हलवण्यात आले आहे. मलब्याखाली अजूनही दोन जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आल्यामुळे अद्यापही या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरूच असल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेचे बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त शशिकांत तांडेल यांनी लोकसत्ताला ही माहिती दिली.

पहाटे इमारत कोसळल्यानंतर नागरिकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले. (फोटो – नरेंद्र वास्कर)

माध्यमांशी बोलताना नवी मुंबई महानगरपालिका (Building Collapse in Navi Mumbai) आयुक्त म्हणाले, “ही इमारत पहाटे ५ वाजताच्या सुमारास कोसळली. ही तीन मजली इमारत होती. इमारतीत ३९ प्रौढ आणि १३ मुले राहत होती. दोन जणांना वाचवण्यात यश आले असून, दोन जण अडकल्याची शक्यता आहे.बचाव कार्य चालू आहे.”

हेही वाचा >> इमारत कोसळण्याची प्रमुख कारणे..

दरम्यान ही १० वर्षे जुनी इमारत होती. त्यामुळे या दुर्घटनेत जो दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल असंही आयुक्त म्हणाले.

“शहाबाज गावातील या दुर्घटनेतील ही चार मजली इमारत अनधिकृत असून २००९ मध्ये ही इमारत उभी करण्यात आली आहे. या इमारतीला महापालिकेच्या वतीने २०११ रोजी नोटीस बजावण्यात आली होती. महेश कुंभार या विकासकामार्फत ही बेकायदा इमारत उभी करण्यात आली असून जमीन मालक शरद वाघमारे यांच्या जागेवर ही इमारत उभी राहिली आहे. सदर प्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे”, असं बेलापूरचे सहाय्यक आयुक्त शशिकांत तांडेल म्हणाले.

ग्रॅन्ट रोड येथे बाल्कनीचा भाग कोसळून एक मृत्यू

गेल्या आठवड्यात ग्रॅन्ट रोड परिसरात एका इमारतीच्या बालकीचा काही भाग कोसळला होता. या दुर्घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले होते. ग्रॅन्ट रोड रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या रुबिनिसा इमारतीत ही दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेनंतर तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले.

इमारत कोसळण्यामागच्या कारणांचे दोन प्रमुख विभाग करता येतात. तज्ज्ञांच्या मते, भारतातील बहुतेक इमारत दुय्यम दर्जाचे बांधकाम साहित्य वापरल्याने, त्या साहित्याबद्दल योग्य माहिती नसल्यामुळे, कुशल मनुष्यबळ नसल्यामुळे आणि बहुमजली इमारत बांधताना योग्य व पुरेशी देखरेख न केल्यामुळे कोसळतात.

Story img Loader