नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ६ येथे बुधवारी रात्री आठ वाजता चार मजली इमारतीतील एका विंगचा स्लॅब खालील दोन मजल्यावर कोसळून एक महिला व एक पुरुष ठार झाले. तर चार जण जखमी झाले आहेत. या घटनेत याच इमारतीमधील पतीचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी अत्यवस्थ असून तिच्यावर उपचार सुरु आहे. तसेच आणखी एक जखमीवर डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

नेरूळ येथे सेक्टर ६ येथील तुलसी भवन इमारतीत तिसऱ्या मजल्यावर लादी लावण्याचे काम सुरू होते. त्यादरम्यान बुधवारी रात्री ही घटना घडली होती. घटनेत तिसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळून दुसऱ्या त्यानंतर तिसऱ्या मजल्यावर कोसळल्याने दुर्दैवी घटना घडली आहे. यात २ जणांचा मृत्यू झाला असून दोघा जखमींपैकी शिंगाडे यांची पत्नी अत्यवस्थ अवस्थेत असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर इतर चार जणांना आयुक्त राजेश नार्वेकर, मुख्य अभियंता संजय देसाई , प्रमुख बाबासाहेब राजळे यांनी व अग्निशमन दलाने तातडीने डेब्रिज हटवण्यात सुरुवात करत रूग्णालयात दाखल केले होते.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Bengaluru
Bengaluru : धक्कादायक! पत्नीच्या जाचाला कंटाळून अभियंता पतीने गळफास घेऊन जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये पत्नीवर केले गंभीर आरोप
seven killed 43 injured in kurla bus accident
कुर्ला बस अपघातात ४३ जखमी, सात जणांचा मृत्यू; भाभा रुग्णालयात ३८, तर शीव रुग्णालयात ७ जणांवर उपचार
Atul Suhas Suicide
“न्याय प्रलंबित आहे”, गळ्यात फलक लटकावून तरुणाची आत्महत्या; २४ पानी नोटमुळे पोलिसांसमोर आव्हान वाढले!

हेही वाचा : उरण येथील चिटफंड घोटाळ्यात पोलीसांचे हात ओले; नवी मुंबई पोलीस आयुक्तांची तीन पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

ही इमारत कालच रात्री खाली करण्यात आली असून इतर कुटुंबांना दर्शन दरबार या गुरुद्वारात तर काही कुटुंबांना नेरूळ सेक्टर ९ येथील अहिल्याबाई होळकर सभागृहात ठेवण्यात आले आहे. ही इमारत २३ वर्षापूर्वीची आहे. इमारतीत तिसऱ्या मजल्यावर दुरुस्तीचे व लादी बसवण्याचे काम आम्ही करत असतानाच ही घटना घडली असल्याची माहिती युनूस अली या कामगाराने दिली. ‘तुलशी भवन या इमारतीमधील काम सुरु असताना ही घटना घडली. पालिकेने आता आमची योग्य सोय करावी. मोठा आवाज झाल्याने कुटुंबासह धावत खाली आलो’, असे रहिवाशी वसंत मोरजे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : भूखंड घेताय? सावधानता बाळगा अन्यथा फसवणूक…

सासवड येथील २३ वर्षांची इमारत असून निकृष्ट कामामुळेच या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर काम सुरू असतानाच स्लॅब कोसळल्यामुळे १२.५ टक्के लोखंडावर उभ्या असलेल्या नवी मुंबईतील हजारो इमारतीतील व शहरातील अति धोकादायक असलेल्या इमारतीतून नागरिकांचा जीव टांगणीला लागलेला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Story img Loader