नवी मुंबई : नवी मुंबईत एकाच दिवशी पाच घरफोडीची नोंद करण्यात आली असून यात दोन दुकाने तर अन्य घरे आहेत. यात एकूण १० लाख ३८ हजार ४१० रुपयांचा ऐवज चोरी झाला आहे.

शिरवणे एमआयडीसी येथे असणाऱ्या टाटा आणि मारुती या कंपन्यांच्या वाहनांच्या दुकानांतून अज्ञात चोराने ३ लाख १६ हजार ९१० रुपयांची रोकड चोरी केली आहे. ही चोरी १७ सप्टेंबर रोजी अपरात्री करण्यात आली आहे. चोरट्यांनी दुकानांचे दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. विशेष म्हणजे एकाच रात्री ही चोरी करण्यात आल्याने चोर एकच असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही दुकानांची मिळून एकच तक्रार घेत अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा लागू करण्यात आला आहे.

Gujarat gold chain snatchers thieves active in vasai
गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
taloja housing project fraud case court takes serious note of the plight of flat buyers
तळोजास्थित गृहप्रकल्प कथित फसवणूक प्रकरण : सदनिका खरेदीदारांच्या दुर्दशेची न्यायालयाने घेतली गंभीर दखल
Nalasopara Unauthorized Building, Supreme Court,
पुरे झाली शोभा…
senior citizen cheated , Crime case against cyber thieves,
पुणे : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा
Four lakhs cash was stolen, hotel, Kalyaninagar area,
कल्याणीनगर भागातील हॉटेलमधून चार लाखांची रोकड चोरीला
Hyderabad Police
Hyderabad : चोरांचा प्रताप, रुग्णवाहिका चोरली अन् बचावासाठी लढवली अनोखी शक्कल; पोलिसांनी केला सिनेस्टाईल पाठलाग
tires of seized cars stolen pune
पुणे : चतु:शृंगी पोलिसांनी जप्त केलेल्या मोटारींचे टायर चोरीला, पोलीस ठाण्याच्या आवारात चोरी झाल्याने खळबळ

हे ही वाचा…नवी मुंबई : बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा

सेक्टर ४८ नेरुळ येथील शिवदर्शन सोसायटीमध्ये एका सदनिकेत चोरी झाली आहे. १५ ते १८ सप्टेंबरच्या दरम्यान ही चोरी झाली असून चोरट्याने उघड्या दरवाजातून आत प्रवेश करीत दोन लॅपटॉप आणि एक मोबाइल असा २० हजारांचा ऐवज चोरी केला आहे. याबाबत नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

घरफोडीची तिसरी घटना नेरुळ सेक्टर २३ येथील सिद्धिविनायक सोसायटीत राहणारे रोहित पालेकर यांच्या घरात झाली आहे. चोराने घराचे दरवाजाचे कडी व कुलूप तोडून आत प्रवेश करीत २ लाख १९ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला आहे.

हे ही वाचा…पनवेल : गरजेपोटी घरांबाबतच्या फेरनिर्णयासाठी बैठक

नेरुळ पोलीस ठाणे हद्दीत आणखी एक घटना घडली. आदिल हाऊस, दारावे गावात झाली आहे. १८ सप्टेंबरला सकाळी दहा ते संध्याकाळी सहाच्या दरम्यान ही चोरी झाली असून दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्याने आत प्रवेश करत ४ लाख ८२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरी केला आहे.

हे ही वाचा…नवी मुंबई : सिडकोची घरे स्वस्त होणार? नवनियुक्त अध्यक्ष संजय शिरसाट यांचे संकेत

या शिवाय जबरदस्तीने घरात घुसून काहीही कारण नसताना घरात राहणाऱ्यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणेअंतर्गत असणाऱ्या भीमनगर येथे घडला आहे. ललित देवकांनी हे भीमनगर येथे राहत असून १८ तारखेला ललित हे घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास काही लोक त्यांच्या घरात घुसले आणि त्यांना बेदम मारहाण करून निघून गेले. याबाबत अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Story img Loader