नवी मुंबई : तुर्भे सेक्टर २० येथील सामंत विद्यालयात चोरी झाली असून प्रार्थमिक विभागातील कार्यालयात घुसून चोरट्याने ९० हजार ३०० रुपयांची रोकड चोरी केली आहे. सदर घटनेबाबत एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आणखी वाचा-कुर्ला येथील रेल्वेरुळ पाण्याखाली गेल्याने पनवेलहून मुंबईचा रेल्वेप्रवास ठप्प
तुर्भे सेक्टर २० येथे सामंत नावाचे विद्यालय असून सदर विद्यालयाच्या प्रार्थमिक शाळेत चोरी झाली आहे. सदर चोरी चार ते पाच तारीख दरम्यान झाली आहे. नेहमी प्रमाणे शाळेच्या शिक्षेत्तर कर्मचाऱ्यांनी शाळेला टाळा लावला होता, मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आल्यावर कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप कडी कोयंड्यासहित तोडलेले आढळून आले. आत जाऊन पाहणी केली असता कपाटातील ९० हार ३०० रुपयांची रोकड नाहीशी झाल्याचे लक्षात आल्यावर याबाबत एपीएमसी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येथे पाहणी करून अनोळखी व्यक्ती विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
© The Indian Express (P) Ltd