लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पनवेल : खारघर वसाहतीमध्ये चोरट्यांचा सूळसूळाट वाढला असून बुधवारी मध्यरात्री सेक्टर १२ मधील एका रो हाऊसमध्ये तीन चोरट्यांनी घरात शिरुन तब्बल ५२ लाख रुपयांचे सोन्याचांदीचे दागीने आणि रोख रक्कम लंपास केली. याबाबत गुरुवारी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

आणखी वाचा-पनवेल : डंपरच्या धडकेत पोलीस शिपाई ठार

खारघरमधील सेक्टर १२ येथील साई कुंज बंगल्यामध्ये ही चोरी झाली असून या बंगल्यामध्ये राहणाऱ्या रीतू पांडे यांनी पोलीसांना दिलेल्या तक्रारीमध्ये बुधवारी मध्यरात्री सव्वा दोन वाजता ते साडेतीन वाजेदरम्यान एका तासात चोरटे खिडकीमधील लोखंडी पाईप तोडून घरात शिरले. पांडे यांच्या पहिल्या मजल्यावरील कपाटात ठेवलेले कुटूंबातील सर्वांचे सोने चांदीचे दागीने चोरट्यांनी लंपास केले. खारघरचे पोलीस त्या तीन चोरांचा शोध घेत आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Burglary of rs 52 lakh in kharghar mrj