लोकसत्ता टीम

पनवेल : कामोठे वसाहतीमधील सेक्टर १९ येथील साईकीरण सोसायटीमध्ये सोमवारी दुपारी तब्बल सहा लाख रुपयांची घरफोडी झाली आहे. या घटनेनंतर पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

आणखी वाचा-पनवेल आगारात एसटीत चढताना सोनसाखळी चोरी

कामोठे येथील सेक्टर १९ मधील साईकिरण सोसायटीमधील सदनिका क्रमांक २०३ मध्ये ३४ वर्षीय सुमित शिंदे राहतात. शिंदे हे सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत घराबाहेर असताना ही चोरी झाली. चोरट्यांनी शिंदे यांच्या घराचे कुलूप कशाने तरी उघडून ही चोरी केल्याने पोलीसांना दिलेल्या तक्रारीत शिंदे यांनी म्हटले आहे. या चोरीत चोरट्यांनी १२० ग्रॅमचे सोन्याचे दागिने चोरले.

Story img Loader